home page top 1

वाहतूक पोलिसाला मारहाण करणारे निगडी पोलिसांकडून अटकेत

पुणे/निगडी : पोलीसनामा ऑनलाइन – रहदारीच्या ठिकाणी अडथळा ठरणारी वाहने बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून निगडी वाहतूक शाखेत कार्य़रत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दोघांनी बेदम मारहाण केली. ही घटना तळवडेतील त्रिवेणीनगर चौकात घडली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

दीपक शंकर यादव (वय-३९ रा. त्रिवेणीनगर) आणि सतीश सोपान खराडे (वय-३२ रा. मोशी प्राधिकरण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी रामहरी तनपुरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.२६) दुपारी एकच्या सुमारास त्रिवेणीनगर चौकात घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ऐकच्या सुमरास त्रिवेणीनगर चौकाजवळील शरदनगर झोपडपट्टी समोरील वाहतूक नियमन सुरु होते. त्यावेळी रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्दतीने आरोपींनी दुचाकी (एमएच 14 एचजी 8462) रस्त्यावर उभी केली होती. त्यावेळी तनपुरे यांनी दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र आरोपींनी त्याला नकार देत त्यांना शिवीगाळ केली. तनपुरे यांच्या मदतीसाठी आलेले पोलीस कर्मचारी विकास आवटे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत आवटे हे जखमी झाले आहेत. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like