Video : पुण्यात नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक पोलिसानं दुचाकी थांबवली ! दुचाकीस्वारानं फरफटत नेल्यानं पोलिस हवालदार जखमी; व्हिडीओ CCTV मध्ये कैद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – नाकाबंदी दरम्यान दुचाकीस्वाराला अडविले असताना तो धक्का देऊन पळून जाऊ लागला. तेव्हा त्याला अडविण्याच्या प्रयत्नात पोलीस Police हवालदार यांचा हात फायबरचे कॅरिअरमध्ये अडकला. त्यामुळे ते सुमारे ५० फुट फरफटत गेले. त्यात ते जखमी झाले आहेत.ही घटना वाकड हिंजवडी रोडवर इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. याप्रकरणी हिंजवडी वाहतूक विभागातील पोलीस हवालदार शंकर तुकाराम इंगळे (वय ४७) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन संजय एकनाथ शेडगे (वय ४२, रा. मु़ पो़ आढाले, खुर्द, ता. मावळ) याला अटक केली आहे.

https://twitter.com/i_am_Ravindra1/status/1398484226274562050

ते आपल्या सहकार्‍यांसह वाकड हिंजवडी रोडवर नाकाबंदीच्या कर्तव्यावर होते. त्यांनी संजय याला गाडी बाजूला घेऊन त्याच्याकडे गाडीचे लायसन्स, कागदपत्रेबाबत विचारणा केली. तेव्हा ते धक्का देऊन पळून जाऊ लागले. त्यावेळी त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. गाडीच्या मागील बाजूस फायबरचे कॅरिअरला त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इंगळे यांचा हात अडकला. त्यांनी त्यास थांब थांब म्हणाले. तरीही स्कुटीचालकाने गाडी न थांबविता त्यांना ५० फुट अंतरापर्यंत ओढत फरफटत नेले. त्यामुळे फिर्यादीचे डावे पायाचे गुढग्याला, उजव्या पायाचे टाचेला मार लागून कपडे फाटले व दुखापत झाली. पोलिसांनी Police सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन दुचाकीस्वाराला अटक केली आहे.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी