नियम पाळणाऱ्या पुणेकरांना १७ डिसेंबर पर्यंत मिळणार फुकट चहा 

पुणे ; पोलीसनामा ऑनलाईन : जागतिक चहा दिनानिमित्त पुण्यात वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना मोफत चहाचे वाटप करण्यात आले. पुण्यातील झाशीची राणी चौकातही हा उपक्रम राबविण्यात आला, यावेळी वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते, आणि पाेलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.
जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने वाहतूकीचे नियम पाळणाऱ्यांना माेफत चहा देण्यात यावा अशी कल्पना वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी मांडली. त्यानुसार वाहतूकीचे नियम पाळणाऱ्या 10 हजार नागरिकांना चहाचे कुपन देण्यात येणार आहे. हे कुपन येवले चहाच्या दुकानात दाखविण्यानंतर माेफत चहा पिता येणार आहे. या उपक्रमात वाहतूक शाखा सुद्धा सहभागी झाली. आज सकाळी झाशीची राणी चाैकात सातपुते यांनी स्वतः पाेलीस कर्मचाऱ्यांसाेबत वाहतूकीचे सर्व नियम पाळणाऱ्या नागरिकांना चहाच्या कुपनचे वाटप केले. तसेच ज्यांनी नियम पाळले नाहीत त्यांना नियम पाळण्याचे आवाहन केले.
शहरातील अधिकाधिक जटिल होत चालेल वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी व वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोफत चहा मिळणार आहे  पुण्यामध्ये सर्रास वाहतूकीचे नियम मोडले जातात. त्यामुळे अनेकदा अपघातानाही सामोरे जावे लागते. याच पुणेकरांनी वाहतूकीची शिस्त पाळावी  त्यावेळी जे नागरिक वाहतूकीचे नियम पाळतात त्यांना चहा देण्यात यावा अशी कल्पना मांडली. त्यानुसार पुण्यातील विविध चाैकांमध्ये आज चहाचे कुपन वाटण्यात येणार आहे. यातून नागरिकांमध्ये नियम पाळण्याबाबत चांगला संदेश जाणार आहे. तसेच पाेलीस हे नेहमी चलन फाडतात आणि पैसे येठण्याचा प्रयत्न करतात अशी नागरिकांमध्ये समज असते. परंतु पाेलीस चांगल्या गाेष्टींना देखिल प्राेत्साहन देतात हा संदेश यातून नागरिकांमध्ये जाणार आहे.
वाहतूकीचे नियम पाळणाऱ्या 10 हजार पुणेकरांना चहाच्या कुपनचे वाटप करण्यात येणार आहे. हे कूपन येवले चहाच्या कुठल्याही दुकानात येत्या 17 डिसेंबरपर्यंत दाखवून चहा पिता येणार आहे.
या आधी ही शहरात वाहतूक सुव्यवस्था राहावी म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले देशात पुणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात अनेकांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल ‘पद्मविभूषण’ सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, याच सांस्कृतिक शहरात वाहतुकीची संस्कृती अजिबात नाही, अशी टीका करीत वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या पुणेकरांना ‘पद्म’ पुरस्कार द्यायला हवा,  सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. पुण्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पद्मभुषण सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
मात्र, याच पुण्यात पोलिसांना चुकवून आणि त्यांच्यासमोर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता सगळ्यात जास्त वाहतुकीचे नियम मोडले  म्हणून त्यांना पद्म पुरस्कार द्यायचा का? वाहतुकीचे नियम हे पोलीस असल्यानंतरच पाळायचे. पोलीस नसेल तर नियम तोडायचे ही पद्धत शहराला शोभणारी नाही. प्रत्येक चौकात पोलीस उभे करण्यास मर्यादा आहेत. वाहतुकीच्या संस्कृतीमध्ये आपण फारच मागे आहोत, हे फारच दुर्दैव आहे. आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी त्यांनी हेल्मेट वापरावे याकडे पालक लक्ष देत नाही
हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी म्हणून पोलिसांकडून शहरातील मॉलशी संपर्क साधण्यात आला आहे. हेल्मेट घालून आलेल्या दुचाकीचालकांना पार्कीगमध्ये सवलत दिली जावी, असा उपक्रम राबविण्यात आला.