15 KM अतंरापर्यंत गाडी चालवताना हेल्मेटची गरज नाही ? जाणून घ्या व्हायरल मेसेजचे सत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ, मेसेज व्हायरल होत असतात. त्या मेसेजची सत्यता न पडताळून पाहाता लोक तो मेसेज इतर ग्रुपवर व्हायरल करत असतात. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सोशल मीडियावर अनेक मेसेज आणि व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक मेसेज आपण वाचला देखील असेल. मेसेजची सतत्या पडताळून न पाहता व्हायरल केल्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम किंवा संभ्रम होण्याचा धोका अधिक असतो. सध्या सोशल मीडियावर वाहतूक नियमासंबंधी एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मसेजमध्ये सांगितले आहे की, 15 किलोमीटर अंतरापर्यंत गाडी चालवणाऱ्यांना हेल्मेट सक्तीचं नाही. सध्या हा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेज मागील सत्यता पडताळून पाहिली असता हा मेसेज खोटा असल्याचे सिद्ध झाले. पीआयबीने देखील हा व्हायरल मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे. अंतर कितीही असो हेल्मेट घालणं सक्तीचं आहे. त्यामुळे अशा खोट्या मेसेजपासून तुम्ही सावध राहिले पाहिजे आणि कोणत्याही अशा प्रकारच्या मेसेजची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे.

काय आहे व्हायरल मेसेज ?
व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला आहे की, सागर कुमार जैन नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने निर्णय दिला आहे. जैन यांच्या याचिकेचा हवाला देत व्हॉट्सअॅपवर मेसेज व्हायरल होत आहे. महानगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रांच्या 15 किमीच्या आत लोकांना वाहन चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक राहणार नाही.

व्हायरल मेसेजमध्ये असेही लिहिले आहे की, जर कोणत्याही वाहतूक पोलिस किंवा पोलिस हेल्मेट न घालण्याविषयी विचारत असतील तर मी नगरापालिका किंवा नगरपंचायतीच्या हद्दीत रहात आहे असे सांगा. कारण आता शहराच्या 15 किमीच्या परिघात हेल्मेट घालणे बंधनकारक नाही. मागील काही महिन्यांपासून वाहतूक आमि हेल्मेट संदर्भातील नियम कठोर करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या काळात असे फेक मेसेज व्हायरल होत असून नागरिकांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.