महापूराच्या थैमानानंतर आता ‘सांगली – कोल्हापूर’ मार्ग वाहतूकीसाठी ‘खुला’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली, कोल्हापूरला महापूराचा मोठा फटका बसला आहे यामुळे अनेक पूरग्रस्ताचे संसार पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेकांना जलसमाधी मिळाली आहे. या दरम्यान ८ दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेले रस्ते, महामार्ग आज सुरु करण्यात आले आहे. सांगली, कोल्हापूर रस्ता देखील १ वाजेच्या सुमारास सुरु करण्यात आले. या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अकंली पूलावरुन वाहतूक सुरु करण्यात आल्यानंतर दुपारी पूल ओलांडण्यासाठी २० – २५ मिनिटांचा कालावधी लागत होता. मागील आठवड्यात पावसाच्या तांडवामुळे सांगली कोल्हापूर महामार्ग वाहतूकीसाठी पूर्णता बंद करण्यात आला होता.

पाणी ओसल्यानंतर आता या महामार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. दुपारी आयर्विन पुलावरुन पाण्याचा पातळी ४५ फुटांपर्यंत आली होती. कोल्हापूर हून सांगलीला येणाऱ्या वाहनांची संख्या कमी आहे. या दरम्यान सांगली ते नांद्रे, कर्नाळा रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.

या मार्गावर पाणी आल्याने तब्बल ८ दिवस वाहतूक अडून राहिली होती, यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. यामुळे या मार्गाहून होण्याचा वाहतूकीवर परिणाम झाला होता. यामुळे व्यापारात व्यत्यय आला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like