रेशनसाठी आलेल्या मोठ्या धान्यसाठ्याची तस्करी ; रंगेहाथ माल पकडत ACB ची कारवाई

पणजी(गोवा) : वृत्तसंस्था – रेशनकार्डवर येणारे धान्य बऱ्याचदा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत असतात. स्वस्त धान्य दुकानदार बऱ्याचदा हे धान्य लाटतात असे आरोपही होतात. आता एक असेच प्रकरण गोव्यामध्ये उघडकीस आले असून येथील कोलवाड येथे एका खासगी गोदामात उतरविले जाणारे स्वस्त धान्य दुकानांसाठी आलेले तांदूळ, गहू आदी धान्य दक्षता खात्याच्या लाचलुचपत विरोधी विभागाच्या पथकाने धाड घालून पकडले. रंगेहात पकडले गेलेले से सामान काळ्या बाजारात विकण्यासाठी कोल्हापूरला पाठविले जाणार होते. दरम्यान भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ आणि आरोपींवर भादंविच्या कलम ४०६ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून उचललेला माल म्हणजेच गहू आणि तांदुळाचा साठा सत्तरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांसाठी आला होता. परंतु प्रत्यक्षात तो तिथे पोचवता परस्पर कोलवाड येथील हिरा पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या एका खाजगी गोदामात नेण्यात आला. तेर्थून तो कोल्हापूरला नेला जाणार होता मात्र पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी तत्परतेने धाड टाकून माल पकडला. शुक्रवारी पहाटे घडलेल्या या घटनेविषयी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुप्तता बाळगत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

कारवाई संशयास्पदपणे गुंडाळली ?
सदर कारवाईबाबत लाचलुचपतविरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसलीही माहिती देण्यास साफ नकार दिला. त्यामुळे स्थानिक राजकीय नेत्याच्या दबावामुळे कारवाई दडपली गेल्याची चर्चा परिसरात होती. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी शक्यता फेटाळून लावत असाच प्रकार राज्यात इतरही चालू असण्याच्या शक्यतेमुळे आणि रेशन धान्याचा काळाबाजार कुठे आणि कसा होतो आहे हे तपासण्यासाठी गुप्तता पाळत असल्याचे सांगितले. तसेच सध्या याबाबत अधिक माहिती देता येणार नाही असे सांगत अधिकची माहिती देणे टाळले.

तब्बल ४५० दुकानांसाठीचा हा मोठा साठा आज रंगेहात पकडला गेल्याने परिसरात मोठी खळबळ माजली. यासंदर्भात अधिकचा तपास चालू असून एक मोठी साखळी या प्रकरणामागे असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –