आंध्र प्रदेशमध्ये यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात; 14 ठार

कर्नूल : पोलिसनामा ऑनलाईन – आंध्र प्रदेशच्या कर्नूलजवळ राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने यात्रेकरुंना घेऊन भरधाव वेगाने जाणारी मिनीबस ट्रकला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात १४ जण ठार झाले. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश असून सोमवारी पहाटे हा अपघात झाला. दरम्यान, अपघातात ४ लहान मुले बचावली असून त्यापैकी दाेघांची प्रकृती गंभीर आहे.

बसमधील सर्व यात्रेकरू चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ली येथून राजस्थानातील अजमेर येथे जात हाेते. अजमेरला जाण्यासाठी तेथून थेट रेल्वे नसल्यामुळे या भागातील अनेक जण बसनेच अजमेरला जातात. या यात्रेकरूंच्या बसचा कर्नूलजवळ वेलदर्ती गावाजवळ अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये एकूण १८ यात्रेकरू हाेते. महामार्गावरील दुभाजकाला बस सर्वप्रथम धडकली. त्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. अपघात एवढा भीषण हाेता की संपूर्ण बसचा चक्काचूर झाला असून आतमधील प्रवाशांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. चालकाचा डाेळा लागला की टायर फुटल्याने ही घटना घडली, याबाबत तपास सुरू आहे.

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमाेहन रेड्डी यांनीही शाेक व्यक्त केला आहे. जखमी मुलांवर सर्वताेपरी उपचारांच्या सूचना मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.