मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वडिलांचे दुःखद निधन, ‘हा’ फोटो शेअर करत झाली भावूक

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   भाग्यश्री लिमये चे वडील माधव लिमये यांचं गुरुवारी निधन झाले. भाग्यश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बाबांसोबतचा फोटो पोस्ट करत त्याला ‘Rest in peace, Baba! ♥️’ असं कॅप्शन दिलं. भाग्यश्रीच्या पोस्टवर मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. सुव्रत जोशी, सुबोध भावे, स्पृहा जोशी, शंशाक केतकर आणि श्रुती मराठेसह अनेक कलाकारांनी भाग्यश्रीला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, भाग्यश्रीचे वडील बऱ्याच दिवसांपासून आजारी होते व त्यांच्यावर सोलापूरमध्ये उपचार सुरु होते. भाग्यश्री नेहमीच तिच्या आई-वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते ज्यावरून तिच्या पालकांसोबत तिचे असलेले स्ट्रॉँग बॉडिंग कायम दिसते.

भाग्यश्रीने वर्ष 2017 मध्ये ‘घाडगे & सून’ या मराठमोळ्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत तिने साकारलेली अमृता प्रभुणेची भूमिका चांगलीच गाजली होती. अभिनय श्रेत्रात येण्यापूर्वी भाग्यश्री एका आयटी कंपनीमध्ये काम करत होती व तिने या आधी अनके जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे.