TRAI And DoT Start KYC Based Caller Name Display | बनावट कॉल करून कुणीही देऊ शकणार नाही त्रास, मोबाईल डिस्प्लेवर कॉलरचे दिसणार KYC चे नाव; TRAI आणत आहे नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – TRAI And DoT Start KYC Based Caller Name Display | भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण Telecom Regulatory Authority of India (TRAI) आणि दूरसंचार विभाग Department of Telecommunications (DoT) लवकरच एक सुविधा सुरू करणार आहेत ज्यामुळे बनावट कॉलची समस्या सोडवली जाऊ शकते. TRAI द्वारे KYC आधारित प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. जेव्हा ते लागू केले जाईल, तेव्हा कॉलिंग वापरकर्त्याचे केवायसी नाव तुमच्या मोबाइलवर प्रदर्शित होईल. ट्रायचे अध्यक्ष पी.डी. वाघेला म्हणाले की, काही महिन्यांत यावर चर्चा सुरू होण्याची अपेक्षा आहे. (TRAI And DoT Start KYC Based Caller Name Display)

 

अंमलबजावणीचा काय होईल फायदा
ट्रायने हा नियम लागू केल्यानंतर कोणताही यूजर आपली ओळख लपवू शकणार नाही. कॉल केल्यावर केवायसी नाव दिसेल. याच्या मदतीने तुम्ही फेक आणि स्पॅम कॉल्सपासून आधीच सावध व्हाल. याआधीही फोन करणार्‍याचे नाव पाहण्याची सुविधा TrueCaller अंतर्गत असली तरी त्यावर वेगळे नाव दिसल्याने फसवणूक होण्याची शक्यता आहे.

 

सर्व यूजरला करावे लागेल केवायसी
ही नवीन केवायसी आधारित प्रक्रिया दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार असेल. या प्रक्रियेअंतर्गत, कॉल करणार्‍याला केवायसीद्वारे ओळखता येईल. या प्रक्रियेत, टेलिकॉम कंपन्यांच्या वतीने, यूजरना केवायसीसाठी अधिकृत नाव, पत्ता प्रविष्ट करावा लागेल. याशिवाय मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना किंवा वीजबिलाची पावती कागदपत्र म्हणून द्यावी लागणार आहे.

केवायसी आधारित कॉलरचे नाव म्हणजे काय?

हे केवायसी तपशीलांमध्ये नोंदवलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

केवायसी प्रक्रिया नवीन सिम खरेदी करताना किंवा जुने बदलताना अनेकदा पूर्ण केली जाते.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, ही प्रक्रिया यूजर्सना फसवणुकीपासून वाचवेल.

 

कशी मदत करेल

हे स्पॅम कॉल आणि संदेश ओळखण्यात मदत करू शकते.

डिजिटल फसवणूक देखील याद्वारे मोठ्या प्रमाणात रोखली जाऊ शकते.

आता यूजर्सना नंबर ओळखण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅप्स इन्स्टॉल करावे लागणार नाहीत, जेणेकरून कोणतेही अ‍ॅप तुमचा डेटा चोरू शकणार नाही.

 

Web Title :- trai and dot will be start kyc based caller name display on your phone

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक ! नात्यातील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फिरायला नेऊन मारली ‘मज्जा’ ! 8 महिन्यांची गरोदर राहिल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस

 

Paytm द्वारे या पध्दतीनं मोबाईल केला रिचार्ज तर मिळू शकतो 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या पद्धत

 

Edible Oils Price Down | सर्वसामान्यांना दिलासा ! मोहरीचे कच्ची घानी तेल 40 रुपयांनी स्वस्त; सोयाबीन-शेंगदाणा तेलाचे भावही उतरले