TRAI Channel List | 1 डिसेंबरपासून TV पाहणे देखील महागणार, करावा लागेल 50 टक्केपेक्षा जास्त खर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – TRAI Channel List | घरोघरी दररोज टीव्हीवरील आपल्या आवडीचे कार्यक्रम कुटुंबातील सर्व सदस्य आवडीने पहात असतात. मात्र, महागाईने अगोदरच हैराण झालेल्या लोकांचे मनोरंजन सुद्धा आता महागणार आहे. कारण, 1 डिसेंबरपासून टीव्ही चॅनल्सचे बिल (TRAI Channel List) वाढणार आहे.

 

ट्रायने लागू केली नवीन टेरिफ ऑर्डर (TRAI imposes new tariff order)
देशाचे प्रमुख ब्रॉडकास्टिंग नेटवर्क्स झी, स्टार, सोनी आणि वॉयकॉम 18 ने काही चॅनल्स आपल्या बुकेतून बाहेर काढले आहेत. ज्यामुळे टीव्ही दर्शकांना 50% पर्यंत जास्त खर्च करावा लागणार आहे. टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने नवीन टेरिफ ऑर्डर लागू केल्याने हे दर वाढणार (TRAI Channel List) आहेत.

 

प्रेक्षकांच्या खिशाला कात्री
TRAI ने मार्च 2017 मध्ये टीव्ही चॅनल्सच्या किमतीची न्यू टॅरिफ ऑर्डर (NTO) जारी केली होती. यानंतर 1 जानेवारी 2020 ला NTO 2.0 जारी झाले. यामुळे सर्व नेटवर्क NTO 2.0 नुसार आपल्या चॅनलचे दर बदलत आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) चा विचार होता की एनटीओ 2.0 प्रेक्षकांना केवळ ते चॅनल निवडण्याचा आणि पेमेंट करण्याचा पर्याय आणि स्वातंत्र्य देईल, जे त्यांना पहायचे आहेत.

 

जाणून घ्या काय आहे कारण
ब्रॉडकास्टिंग नेटवर्कच्या एखाद्या बुकेमध्ये ऑफर करण्यात येणार्‍या चॅनलचे मासिक मूल्य 15-25 रुपयांच्या दरम्यान ठेवले होते. परंतु TRAI च्या नवीन टॅरिफ ऑर्डरमध्ये ते किमान 12 रुपये ठरवले आहे. अशावेळी चॅनल्ससाठी आपले बहुतांश चॅनल केवळ 12 रुपयात ऑफर करणे खुप नुकसानकारक होऊ शकते. हे नुकसान कमी करण्यासाठी नेटवर्क्सने काही पॉप्युलर चॅनल्सला बुकेच्या बाहेर काढून त्यांचे दर वाढवण्याचा मार्ग काढला आहे.

किती रुपये होतील खर्च
स्टार प्लस, कलर्स, झी टीव्ही, सोनी आणि काही रिजनल चॅनल सारखे लोकपिय चॅनल पाहण्यासाठी प्रेक्षकांना 35 ते 50 टक्केपर्यंत जास्त पैसे मोजावे लागतील.
नवीन किमतीवर एक दृष्टीक्षेप टाकल्यास जर एखाद्या प्रेक्षकाला स्टार आणि डिज्ने इंडियाचे चॅनल पाहणे सुरू ठेवायचे असेल
तर 49 रुपये प्रति महिना ऐवजी आता तेवढ्याच चॅनल्ससाठी 69 रुपये खर्च करावे लागतील.

 

Sony साठी त्यांना दरमहिना 39 ऐवजी 71 रुपये खर्च करावे लागतील.
ZEE साठी 39 रुपयांऐवजी 49 रुपये आणि Viacom18 चॅनल्ससाठी 25 रुपये प्रति महिनाऐवजी 39 रुपये प्रति महिना खर्च करावे लागतील.

 

Web Title :- TRAI Channel List | tv viewers may have to shell out 50 percent more from 1 december 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

The Big Picture | डोक्यावर पगडी घालून ‘घुमर’ गाण्यावरती थिरकला रणवीर सिंग; तुम्ही पहिला व्हिडीओ ?

Pune News | भाजपने राज ठाकरेंच्या नादाला लागू नये, फटका बसेल – रामदास आठवले (व्हिडीओ)

Multibagger Stock | ‘या’ औषध कंपनीने गुंतवणुकदारांना दिले ‘मनी टॉनिक’, 6 महिन्यात 10 हजाराचे केले 1.62 लाख रुपये