खुशखबर ! ‘TRAI’ कडून नवीन नियमावली, ‘TV’ पाहणं आता होणार स्वस्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने नुकतेच टीव्ही च्या संदर्भात नवीन नियम लागू करण्याचे संकेत दिले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत ट्रायच्या प्रमुखानं या संदर्भात बोलताना सांगितलं की, ट्राय लवकरच नव्या केबल टीव्ही टॅरिफ सिस्टममधल्या कमतरता दूर करण्याच्या संदर्भात विचार करत आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ‘टॅरिफ सिस्टिम लागू करण्यात कुठे कमतरता आलेली नाही ना हे आम्ही पाहतोय, म्हणजे ते शोधून त्यात बद्दल काम करता येईल. त्यासाठी आम्ही माहिती गोळा करतोय. त्यानुसारच पुढचा निर्णय घेऊ आणि पुढील गोष्टी होतील.’

नवीन व्यवस्थेमध्ये अनेक बदल घडून येत आहेत असून पारदर्शकताही वाढत चालली आहे. त्यामुळेच ग्राहकांना आता आपल्या पसंतीनं कुठलाही ऑपरेटर निवडण्याची सुविधा दिलेली आहे. कोणतीही नवी गोष्ट सुरू झाल्यानंतर काही क्षेत्रांमध्ये आशा निर्माण होऊन कामं होतात. आवश्यकतेनुसार काही क्षेत्रांत सुधारणा होण्याची शक्यताही वाढते.

TRAI च्या नियमानुसार नुकतेच झाले होते किमतींमध्ये बदल :
नुकतेच डिसेंबरमध्ये ट्रायनं किमतीत बदल केले होते. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून नवे नियम लागू झाले होते. या नवीन नियमांनुसार प्रेक्षक दर महिन्याला १५३ रुपयांमध्ये ( जीएसटी धरून ) १०० चॅनेल्स पाहू शकतात. पण जर तुम्हाला 100हून जास्त चॅनेल पाहायचे असतील तर पुढच्या २५ चॅनेल्सना २० रुपये द्यावे लागतील. कमीत कमी शून्य ते जास्तीत जास्त १९ रुपये एका चॅनेल्ससाठीचा चार्ज आहे.

सेट टाॅप बाॅक्सलाही मोबाइलसारखं सिम कार्ड उपलब्ध करून देण्याचा TRAI चा प्रयत्न :
अधिकृत माहितीनुसार TRAI नव्या नियमांबरोबर टीव्ही सेट टाॅप बाॅक्सलाही मोबाइलसारखं सिम कार्ड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.याचे कारण म्हणजे प्रत्येक वेळी डीटीएच वेगळ्या कंपनीचा वेगळा सेट टाॅप बाॅक्स असतो. ग्राहकाला कंपनी बदलायची असेल तर तो बदलण्याचा खर्च करावा लागतो. अनेकदा तो खर्च जास्त असल्याने ग्राहक आहे त्या कंपनीसोबत तडजोड करताना दिसतो. सिम कार्डाची पद्धत कधी सुरू होईल याबद्दल कोणतीही निश्चित अशी माहिती नसून डिसेंबर २०१९ पर्यंत हा बदल होईल असा अंदाज आहे. यानंतर ग्राहकाला एकच टीव्ही सेट टाॅप वापरून त्यात वेगवेगळ्या कंपनीचे सिम टाकता येईल.
आरोग्य विषयक वृत्त –
या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी
पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय
‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा
या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे

You might also like