मोबाईल नंबर ‘पोर्ट’ करताय ? ‘हे’ वाचा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजपासून (दि 16 डिसेंबर) मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कमध्ये जाण्यासाठी आता केवळ 3 ते 5 दिवस लागणार आहेत. या नव्या नियमांमुळे ग्राहकांनाच फायदा होणार आहे. कारण पोर्टींग प्रोसेस आता अधिक वेगवान होणार आहे. ग्राहकांना पोर्ट करणं सोपं जाणार आहे असं टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया(TRAI)नं म्हटलं आहे.

पूर्वी जर तुम्ही पोर्टींगसाठी रिक्वेस्ट केली तर त्यासाठी एक आठवडा किंवा 15 दिवसांचा कालावधी लागायचा. परंतु नव्या नियमांनुसार आता 3 दिवस लागणार आहेत. नव्या नियमांनुसार आता पोर्टींगप्रोसेस सोपी होणार आहे ज्यामुळे किमान 3 दिवस तर कमाल 5 दिवसांत पोर्टींगची प्रक्रिया होणार आहे. याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे हे मात्र नक्की.

जर तुमचं सीम पोस्टपेड असेल आणि तुम्हाला पोर्टींग करायचं असेल तर तुम्हाला पहिल्या म्हणजेच आता वापरत असेलल्या नेटवर्क कंपनीमध्ये तुमच्या पोस्टपेड बिलाचा भरणा करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या नेटवर्कमध्ये 90 दिवस झाले असतील तरच तुम्ही (प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहक) दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करू शकता. नंबर पोर्ट करताना ग्राहकांनी सर्व नियम आणि अटींचं पालनं केलेलं असावं. अन्यथा पोर्टींगमध्ये अडचण येऊ शकते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/