खुशखबर ! पोर्टेबिलिटीनंतर आता ‘DTH बिल’ होणार कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘टेलिकॉम अँड ब्रॉडकास्टिंग रेग्युलेटर’ एक नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे डीटीएच बिल पहिल्यापेक्षा कमी होऊ शकते. ट्रायनं जारी केलेल्या नव्या पॉलिसीवर ग्राहक समाधानी नाहीत. त्यामुळे नवीन नियम लागू करण्यात येणार आहे.

जितके चॅनल तितकेच पैसे असा ग्राहक हिताचा निर्णय ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया’ने (ट्राय) ने घेतल्यानंतर आता चॅनेलच्या हिशेबानं पैसे द्यावे लागत आहेत. नियमांनुसार अनेक युजर्सच्या मते त्यांचं बिल कमी झालं आहे. तर काही जण म्हणतात याचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे ‘टेलिकॉम अँड ब्रॉडकास्टिंग रेग्युलेटर’ नवीन नियम लागू करणार आहे. ज्याचा उद्देश द्देश ग्राहकांना येणारं केबल आणि डीटीएचचं बिल कमी करणे आहे.

मोबाईल प्रमाणे आता डीटीएच सेवेतही होणार पोर्टेबिलिटी –
आता केबल ऑपरेटर आणि डीटीएच कंपन्यांच्या सेट-टॉप बॉक्सचे कार्डही बदलता येणार आहे. डीटीएच ऑपरेटर आणि केबल प्रोव्हाईडरची सेवा तुमच्या मनासारखी मिळत नसेल किंवा तुम्ही या सेवेपासून समाधानी नसाल तर मोबाइलच्या नंबरप्रमाणे या सेवेची सुद्धा ‘पोर्टेबिलिटी’ (MNP) करता येऊ शकणार आहे. मोबाइल सिम पोर्टेबिलिटी प्रमाणे डीटीएच कार्ड पोर्टेबिलिटीही निश्चितच होईल. यामुळे ग्राहकाला एकदाच सेट-टॉप बॉक्स विकत घ्यावा लागेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like