16 डिसेंबरपासुन लागू होणार मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचा नियम, फक्त 2 दिवसात पूर्ण होणार काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय ने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) च्या नियमासंबंधित नवी तारीख घोषित केली आहे. एमएनपीच्या नियमांत सातवे संशोधन मागील वर्षी डिसेंबरला झाले होते जे आता 16 डिसेंबर 2019 ला लागू करण्यात येईल.

16 डिसेंबरपासून लागू होणाऱ्या एमएनपीच्या नियमावर मागील वर्षी 13 डिसेंबरवर मोहर लावली होती, नव्या नियमानुसार एमएनपीसाठी अर्ज दिल्यानंतर दोन दिवसांत नवे सिम पोर्ट करण्यात येईल. जर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एमएनपीसाठी अर्ज करतात तर ही प्रक्रिया होण्यास 5 दिवसाचा कालावधी लागला.

नव्या नियमानुसार पहिल्यांदा आलेल्या अहवालात एमएनपीचे नवे नियम 11 नोव्हेंबर पासून लागू होणार होते परंतू पुन्हा एकदा त्यात बदल करण्यात आले होते. एमएनपीसाठी लागणाऱ्या ह्या 2 दिवसांच्या कालावधीचे कारण टेस्टिंग असल्याचे सांगितले जात आहे.

ट्रायच्या मते नवे नियम लागू होण्याआधी याची तपासणी करण्यात येईल जेणेकरुन लोकांना अडचणी येणार नाहीत. ट्रायच्या मते टेलिकॉम ऑपरेटर्सकडून तांत्रिक कारण पाहता नवे नियम आता लागू करण्यात आले नाहीत.

नव्या नियमाने मिळले फायदा –

नव्या नियमानुसार एक टेलिकॉम ऑपरेटर दुसऱ्या ऑपरेटरवर स्विच करण्यासाठी उपभोगत्यांना बरीच वाट पाहावी लागते. आता नंबर पोर्ट करण्यासाठी 7 दिवस लागतात परंतू हे नियम लागू झाल्यानंतर दोन दिवसांचा कालावधी लागेल.

Visit : Policenama.com