DTH आणि केबल TV साठीच्या 1 मार्चपासून लागू होणाऱ्या नवीन नियमांना स्थगिती, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणास (ट्राय) नॅशनल टॅरिफ ऑर्डर २.० (NTO २.०) लागू करण्यास आणखी काही कालावधी लागू शकेल. वास्तविक, मुंबई उच्च न्यायालयाने आयबीएफ विरुद्ध ट्रायची सुनावणी २६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी ट्रायने केलेल्या टॅरिफ योजनांमध्ये बदल केल्यामुळे ब्रॉडकास्टर्समध्ये नाराजीचा सूर होता. इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनने (IBF) प्रसारणकर्त्यांसाठी या समस्येपासून मुक्त होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

या प्रकरणातील सुनावणी मागील ४ आठवड्यांपासून रखडली आहे. ३० जानेवारी रोजी कोर्टाने हे खटले १२ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केले. त्याचबरोबर आता ते २६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. त्यामुळे डीटीएच आणि केबल टीव्ही ऑपरेटरच्या नवीन योजना १ मार्चपासून लागू होणार नाहीत, हे यातून स्पष्ट दिसत आहेत.

आयबीएफ हे सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (एसपीएनआय), स्टार इंडिया, टीव्ही १८, झीईएल, व्हायकॉम १८, झूम एंटरटेनमेंट आणि फिल्म अँड टेलिव्हिजन यासारख्या लोकप्रिय ब्रॉडकास्टर्सचे प्रतिनिधित्व करतात. अशा परिस्थितीत आयबीएफला ट्रायच्या नव्या नियमांमधून या ब्रॉडकास्टरला दिलासा मिळावा अशी इच्छा आहे. ट्रायने सांगिल्याप्रमाणे, ज्या प्रकारे ते ऑपरेट करत आहेत. त्यांना आपल्या गोष्टी रिवाइज कराव्या लागतील. तसेच नवीन चॅनेल पॅकमध्ये, कोणत्याही वैयक्तिक चॅनेलची किंमत १२ रुपयांपेक्षा जास्त नसावी. सध्या ब्रॉडकास्टर्स १९ रुपयांमध्ये ए – ला – कार्टे चॅनेल उपलब्ध करुन देत आहेत.

NTO २.० मध्ये युजर्सना येणाऱ्या अडचणी संपवण्याची चर्चा आहे. नवीन ऑर्डर अंतर्गत एनसीएफ स्लॅब २०० चॅनेल्स, मल्टी टीव्ही एनसीएफ चार्ज ४० टक्के असे बरेच बदल होणे अपेक्षित आहे. दरम्यान, आता हे नियम किती काळ लागू होतील हे कळू शकणार नाही.