ADV

TRAI On Alternate Mobile Number | एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरल्यास होईल अडचण, ग्राहकांच्या खिशावर पडणार भार, सरकार वसुल करणार शुल्क

नवी दिल्ली : TRAI On Alternate Mobile Number | मोबाईल वापरत (Mobile Phones) असलेल्या ग्राहकांच्या खिशावर आगामी काळात जास्त भार पडण्याची शक्यता आहे. विशेषता ते लोक, जे एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर वापरतात. याबाबत दूरसंचार नियामकाने एक प्रस्ताव तयार केला आहे.(TRAI On Alternate Mobile Number)

सरकारची संपत्ती आहेत मोबाईल नंबर

भारतीय दूरसंचार नियामक टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) चे म्हणणे आहे की, मोबाईल नंबर्स प्रत्यक्षात सरकारची संपत्ती आहेत. ते दूरसंचार कंपन्यांना मर्यादित काळासाठी वापरण्यास दिले जातात, जे कंपन्या ग्राहकांना अलॉट करतात. यामुळे सरकार मोबाईल नंबर देण्याच्या बदल्यात कंपन्यांकडून शुल्क आकारू शकते.

नियामकाने हा प्रस्ताव मोबाईल क्रमांकाचा दुरुपयोग कमी करण्यासाठी तयार केला आहे. ट्रायचे म्हणणे आहे की, मोबाईल कंपन्या कमी वापर होणारे अथवा दिर्घकाळापासून वापरात नसलेले मोबाईल नंबर सुद्धा बंद करत नाही, जेणेकरून त्यांच्या यूजर बेसवर नकारात्मक परिणाम होऊ नये.

या गोष्टींना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न

सध्याच्या काळात डुअल सिम कार्ड असलेले फोन प्रचलित आहेत.
सामान्यपणे जवळपास प्रत्येक वापरकत्र्याकडे एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर असतात.
बहुतांश लोक दोन मोबाईल नंबर वापरतात. यापैकी एकाचा भरपूर वापर होतो, तर दुसरा नंबर असाच पडून राहतो.

मोबाईल कंपन्या सुद्धा जाणवीपूर्वक असे कमी वापरातील नंबर बंद करत नाहीत. जर कंपन्यांनी असे नंबर बंद केले तर त्यांचा यूजर बेस कमी होईल. ट्राय अशाप्रकारच्या गोष्टींना लगाम घालणार आहे.

प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता

अशा नंबरसाठी सरकार कंपन्यांकडून एकदाच अथवा वार्षिक तत्वावर रिकरिंग पेमेंट घेऊ शकते.
सरकार हे पैसे दूरसंचार कंपन्यांकडून वसूल करेल आणि कंपन्या हा भार ग्राहकांवर टाकतील.
त्यामुळे सेकंडरी अथवा अल्टरनेट मोबाईल नंबरसाठी आगामी काळात ग्राहकांना जास्त खर्च करावा लागेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar-EVM Machine Pooja | रुपाली चाकणकरांची ईव्हीएम पूजा नडली; मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Ranjangaon Ganpati Pune Crime News | ‘ज्वेलर्स’च्या दुकानाचे शटर उचकटून 16 लाख 25 हजारांचे दागिने चोरीला; रांजणगाव गणपती येथील घटना

Anil Deshmukh On Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘मृत तरुण-तरुणी दारु पिऊन गाडी चालवत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न’ माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

Bibvewadi Gangadham Chowk Pune News | गंगाधाम चौक परिसरातील रस्ते भविष्यात होणार मृत्यूचे जाळे? वाढत्या जड वाहतुकीमुळे तीव्र उतारावर वाहनचालकांचा जीव मुठीत घेउन प्रवास (Videos)