आता DTHला देखील KYC, ‘ट्राय’ने मागवल्या ‘सूचना’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माहिती आणि प्रसारण मंत्रालयांने निर्देश दिल्यानंतर टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी इंडिया (ट्राय) ने डीटीएचच्या सेट टॉप बॉक्ससाठी ‘नो युवर कस्टमर’ (KYC) करण्यासाठी कंसल्टेशन पेपर तयार केले आहेत. ट्रायने या पेपर्स संबंधित पक्षांच्या सूचना मागवण्यासाठी सादर केले आहेत.

१९ ऑगस्ट पर्यंत मागवल्या सूचना

२७ डिसेंबर २०१८ ला महिती प्रसारण मंत्रालयाने ट्रायला एक निर्देश पाठवला होता. यात डीटीएच सेवांच्या सेट टॉप बॉक्ससाठी केवायसी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तसेच केवायसी करण्यासाठी सर्व प्रक्रिया विचारात घेण्यात आली होती. ट्रायच्या एका आधिकारी नुसार, या कंसल्टेशन पेपरवर संबंधित पक्ष १९ ऑगस्ट पर्यंत सूचना मागण्यात आल्या होत्या. जर काही सूचना असतील तर त्या २ सप्टेंबर पर्यंत करण्यात याव्यात असे सांगण्यात आले होते.

या प्रश्नांवर मागण्यात आल्या सूचना

१. डीटीएच सेट टॉप बॉक्सची केवायसी करणे आवश्यक आहे?

२. जर उत्तर हो असेल तर कोणती प्रक्रिया उपयोगात आणता येईल?

३. इंस्टाॅलेशन करताना केवायसी करता येईल की काही काळाने योग्य लोकेशन कळाल्यावर केवायसी करतात येईल. जर उत्तर हो असेल तर किती काळाने केवायसी करता येईल.

४. केवायसी करताना ग्राहकांकडून शुल्क घेण्याची आवश्यकता आहेत अथवा नाही.

२००१ साली सुरु झाली डीटीएच सेवा

भारतात २००१ साली डीटीएच ब्रॉडकास्टिंग सेवेला सुरुवात करण्यात आली होती. यवर्षी देखील१५ मार्चला सरकारने डायरेक्ट टू होम (डीटीएच) ब्रॉडकास्टिंग सेवा सुरुवात करण्यासाठी लायसन्स संबंधित मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like