5 वर्षात 95 % ‘स्वस्त’ झाला मोबाईल डाटा, विक्री 56 पटीनं वाढली, आता 1 GB साठी 11 रूपये खर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्रायने मोबाईल डाटा किंमती आणि विक्री संबंधित एक अहवाल सादर केला आहे. मागील पाच वर्षात मोबाइल डाटाच्या किंमतीत जवळपास 95 टक्के कपात होऊन 11.75 रुपये प्रति गीगाबाइटवर आली आहे.

या अहवालानुसार 2014 मध्ये 828 मिलियन जीबी डाटा विकला गेला आहे, तर 2018 साली 46,404 मिलियन जीबी डाटा विकला गेला आहे. ही विक्री 2014 च्या तुलनेत 56 पट अधिक आहे. याशिवाय व्यक्तिगत डाटाचा वापर देखील अनेक पटीने वाढला आहे. 2014 मध्ये व्यक्तिगत डाटाचा खप 0.27 जीबी प्रति यूजर होता, तर 2018 मध्ये तो वाढून 7.6 जीबी प्रति यूजर झाला आहे. 2018 पासून प्रति युजरच्या वायरलेस डाटा यूजमध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि आसाम मध्ये 100 टक्क्यांनी ग्रोथ वाढली आहे.

वायरलेस डाटात 1 वर्षात 131 टक्के वाढ –
2017 मध्ये वायरलेस डाटाचा खप 20,092 मिलियन जीबी झाला होता. तर 2018 साली हा खप 131 टक्के वाढून 46,404 मिलियन जीबी वर पोहचला. 2014 साली वायरलेस डाटाचा खप 828 मिलियन जीबी होता. 2018 साली 4 जी यूजर्सचा डाटाचा खप वाढला. 4 जी मुळे 2018 साली जवळपास 40,304 मिलियन जीबी खप झाला तर 2 जी मध्ये 0.95 टक्के वापर होता. 2018 मध्ये प्रति व्यक्ती उत्पन्न वाढून 90.02 रुपये आहे. जे 2014 साली 71.25 रुपये प्रति यूजर आहे.

वायरलेसमुळे कंपनीच्या उत्पन्नात वाढ –
वायरलेसमुळे टेलीकॉम ऑपरेटर्सचा महसूल वाढला आहे. 2014 साली कंपन्यांना 22,265 कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला, तर 2018 साली यात वाढ होऊन 54,671 कोटी रुपये महसूल वाढला. 2017 साली वायरलेस डाटामधील 38,882 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

पाच वर्षात यूजर्सचा प्रति जीबी डाटा वरील खर्च 269 रुपये प्रति जीबीमध्ये कपात होऊन 11.78 रुपये झाला.

डाटाची किंमत, वर्ष आणि 1 जीबी डाटासाठी करावा लागणारा खर्च –
2014 साली – 226 रुपये (1 जीबी)
2016 साली – 75.57 रुपये (1 जीबी)
2017 साली – 19.35 रुपये (1 जीबी)
2018 साली – 11.78 रुपये (1 जीबी)