#VIDEO : ऋतिकच्या ‘सुपर 30’ सिनेमाचा Trailer Out

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऋतिक रोशनच्या आगामी सिनेमा सुपर 30 चा ट्रेलर आऊट झाला आहे. हा ट्रेलर 2:37 मिनिटांचा असून यात ऋतिकची अप्रतिम पर्सनॅलिटी आणि शानदार अॅक्टींग दिसत आहे. या सिनेमात ऋतिक सोबत मृणाल ठाकूर, नंदिश सिंग, रित्विक साहोरे, पंकज त्रिपाठी, अमित साध, विरेंद्र सक्सेना आणि जॉनी लिवर हे कालाकारही दिसणार आहेत.

ट्रेलर रिव्ह्यु – तुम्हाला सांगू इच्छितो की, सुपर 30 हा सिनेमा पटनातील कोचिंग संस्थापक आनंद कुमार यांच्यावर बनला आहे. त्यामुळे या सिनेमात आनंद कुमार यांचा सघर्ष ते त्यांना रामानुष अॅवार्ड मिळणे आणि अब्दुल कलाम आझाद शिक्षा पुरस्कार मिळणे येथपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. आनंद कुमार यांच्या सुपर 30 मध्ये आर्थिक आणि मागास वर्गातून येणाऱ्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थान(IIT) मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या मेधावी विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग दिली जाते. ट्रेलरमध्ये हे सगळं दाखवण्यात आलं आहे.

या सिनेमात ऋतिक एका शिक्षकाची भूमिका साकारत आहे. ऋतिकचा लुक त्याच्या चाहत्यांचे मन जिंकेल हे मात्र नक्की. हा सिनेमा 12 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकास बहल हे या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.