नवी दिल्‍ली रेल्वे स्टेशनवरच ट्रेनला भीषण आग !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शुक्रवारी दुपारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकात मोठा अपघात झाला. येथे कोचीवेली ते चंदीगडकडे जाणाऱ्या ट्रेनच्या पॉवर कारमध्ये अचानक आग लागली आणि पाहता पाहता तिने रौद्र रूप धारण केले. माहिती मिळताच पोलिस दलाबरोबरच अग्निशमन दलाचे अनेक जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या 32 गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.

ही ट्रेन चंदीगडकडे रवाना होणार होती पण त्याआधीच आग लागली. यावेळी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर उभी होती. दोन बोग्यांना तातडीने आग लागली. तथापि, या कालावधीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे धूर लांबून सुद्धा दिसू लागला होता.

सुरक्षा म्हणून ताबतोब प्लॅटफॉर्मवरील सर्व प्रवाशांना दुसरीकडे पाठवून प्लॅटफॉर्म खाली करण्यात आला. अग्निशमन दलाचे सर्व अधिकारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीची तीव्रता इतकी होती की दोन डब्यांना लगेच आग लागली.

आरोग्यविषयक वृत्त –