Train Coaches Colour | जाणून घ्या ट्रेनचे डबे का लाल, हिरवे आणि निळ्या रंगाचे असतात? कारण अतिशय खास

नवी दिल्ली : Train Coaches Colour | भारतीय रेल्वे (Indian Railways) हे आशियातील दुसर्‍या क्रमांकाचे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतात एकूण 12,167 पॅसेंजर ट्रेन्स आणि 7,349 मालगाड्या आहेत. भारतीय रेल्वेतून दररोज 23 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येएवढी आहे. (Train Coaches Colour)

 

तुमच्या लक्षात आले असेल तर ट्रेनचे डबे तीन रंगाचे असतात हे तुम्ही पाहिले असेल. काही डबे लाल, काही निळ्या आणि काही हिरव्या रंगाचे असतात. ट्रेनचे डबे लाल, निळे आणि हिरव्या रंगाचे का असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या रंगांचा अर्थ काय? ते जाणून घेवूयात (Train Coaches Colour) –

 

1. लाल रंगाचे कोच (Red Coaches)

आजकाल भारतात लाल रंगाच्या डब्यांची संख्या खूप वाढली आहे. लाल रंगाच्या डब्यांना LHB म्हणजेच Linke Hofmann Busch म्हणतात. ते पंजाबमधील कपूरथला येथे तयार केले जातात. हे डबे तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला जातो. यामुळे हे डबे वजनाने हलके असतात.

 

हे डबे डिस्क ब्रेकसह 200 किमी/ताशी वेगाने चालवता येतात. त्याच्या देखभालीवरही कमी खर्च येतो. अपघात झाल्यास हे डबे एकमेकांच्या वर चढत नाहीत. कारण त्यांच्याकडे Center Buffer Couling सिस्टम आहे.

 

2. निळ्या रंगाचे कोच (Blue Coaches)

निळ्या रंगाचे डबेही मुबलक प्रमाणात दिसतात. त्यांना Integral Coach फॅक्टरी कोच म्हणतात. निळ्या डब्यांसह ट्रेनचा वेग 70 ते 140 किमी/ताशी असतो. मेल एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट गाड्यांमध्ये हे डबे वापरले जातात.

 

इंटिग्रल कोच फॅक्टरी तामिळनाडू येथे आहे. ते तयार करण्यासाठी लोखंडाचा वापर केला जातो.
हे डबे जड असतात, त्यामुळे त्यांच्या देखभालीचा खर्च जास्त असतो.
या डब्यांना दर 18 महिन्यांनी ओव्हरहॉल करणे आवश्यक आहे.

 

3. हिरव्या रंगाचा कोच (Green Coaches)

गरीब रथ गाड्यांमध्ये हिरवे कोच वापरले जातात.
तर मीटरगेज गाड्यांमध्ये तपकिरी रंगाचे डबे वापरले जातात.
नॅरोगेज गाड्यांमध्ये हलक्या रंगाचे डबे वापरले जातात.
आता देशातील नॅरोगेज गाड्यांचे संचालन जवळपास बंद झाले आहे.

 

Web Title :- Train Coaches Colour | why train coaches are red
green and blue the reason behind this is very special

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा