ट्रेनमध्ये वाजतात 11 प्रकारचे ‘हॉर्न’, जाणून घ्या त्यांचे ‘अर्थ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आपल्यातील अनेकजण बऱ्याचदा रेल्वे ने प्रवास करतात परंतु बऱ्याच नियमांविषयी आणि संकेतांविषयी आपण अनभिज्ञ असतो. असो, तुम्ही रेल्वे प्रवासात अनेकदा गाड्यांची हॉर्न ऐकली असतील, पण ट्रेनमध्ये किती हॉर्न वाजवली जातात आणि त्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहित आहे का ? आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की ट्रेनचे लोको पायलट ११ वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न वाजवतात आणि त्या सर्वांचे अर्थ भिन्न आहेत. चला तर मग, याठिकाणी जाणून घेऊयात तुम्हाला ट्रेनच्या हॉर्नच्या वेगवेगळ्या अर्थांबद्दल-

एक शॉर्ट (लहान) हॉर्न :
जर ट्रेन चालक शॉर्ट (लहान) हॉर्न वाजवित असेल तर याचा अर्थ असा आहे की ट्रेन यार्डमध्ये आली आहे आणि तिच्या साफसफाईची वेळ झाली आहे.

दोन शॉर्ट हॉर्न :
जर ट्रेनचा चालक दोन लहान हॉर्न वाजवित असेल तर याचा अर्थ असा आहे की ट्रेन आता थांब्याहून पुढे हलण्यास तयार आहे आणि ड्रायव्हर ट्रेनच्या रक्षकांना (गार्ड) सिग्नल विचारत आहे.

तीन शॉर्ट हॉर्न :
सहसा, अशी हॉर्न क्वचितच वाजवली जातात.  आपत्कालीन परिस्थितीत तीन लहान हॉर्न वाजविली जातात. याचा अर्थ असा की लोकोपायलटचे नियंत्रण रेल्वे इंजिनपासून सुटले आहे. हा हॉर्न म्हणजे ट्रेनच्या रक्षकास व्हॅक्यूम ब्रेक त्वरित लावून ट्रेन थांबविण्याचा संकेत देतो.

चार शॉर्ट हॉर्न :
याचा अर्थ असा आहे की ट्रेनमध्ये तांत्रिक त्रुटी आहे आणि ती पुढे जाण्याच्या स्थितीत नाही.

एक लांब आणि एक शॉर्ट हॉर्न :
या हॉर्नचा अर्थ असा की ट्रेन चालक इंजिन सुरू करण्यापूर्वी ब्रेक पाईप सिस्टम सेट करण्यासाठी गार्डला सिग्नल देत आहे.

दोन लांब आणि दोन लहान हॉर्न :
याचा अर्थ असा की गाडी चालक इंजिनवर नियंत्रण ठेवण्यासाठी गार्डला सिग्नल देत आहे.

सातत्याने वाजणार किंवा लॉंग (लांब) हॉर्न :
प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांना सतर्क करण्यासाठी असे हॉर्न वाजविले जातात. जेणेकरून ट्रेन स्थानकावरून नॉन-स्टॉप जात आहे आणि त्या स्थानकावर थांबणार नाही.

दोन वेळा थांबून थांबून वाजणारा हॉर्न :
क्रॉसिंगकडे जाताना हे हॉर्न वाजवले जातात जेणेकरून कोणीही रेल्वे क्रॉसिंगच्या सभोवती येऊ नये.

दोन लांब आणि एक शॉर्ट हॉर्न :
जेव्हा ट्रेन आपला ट्रॅक दुसर्‍या ट्रॅकवर बदलते तेव्हा असे हॉर्न वाजविले जाते.

दोन लहान आणि एक लांब हॉर्न :
असा हॉर्न केवळ दोन प्रसंगी वाजतो. एकतर कोणीतरी चेन पुलिंग केले आहे किंवा गार्डने व्हॅक्यूम प्रेशर ब्रेक लागू केले आहेत.

सहा हॉर्न :
जेव्हा ट्रेन चालकाला धोका उद्भवतो तेव्हा असे हॉर्न वाजविले जाते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like