Amazon देतंय राखीव रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा, नाही लागणार सर्व्हिस अन् पेमेंट गेटवे ट्रांजेक्शन चार्ज, मिळेल ‘कॅशबॅक’

नवी दिल्ली : अमेझॉन इंडियाद्वारे आता ट्रेनचे तिकिट सुद्धा बुक करता येणार आहे. यासाठी अमेझॉन आणि आयआरसीटीसीने भागीदारी केली आहे. अमेझॉन आपल्या वेबसाइटवर तिकिट रिझर्व्हेशन केल्यास पहिल्या ट्रेन तिकिट बुकिंगवर 10 टक्के कॅशबॅक देईल, जे 100 रुपयांपर्यंत आहे. तर, प्राइम मेंबर्सला 12 टक्के कॅशबॅक मिळेल.

कॅशबॅक ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू आहे. नव्या फिचर अंतर्गत सुरूवातीच्या कालावधीतसाठी कंपनीने सर्व्हिस व पेमेंट गेटवे ट्राजक्शन चार्जेसमध्ये सूट दिली आहे. ही एक लिमिटेड पिरियड ऑफर असेल. अमेझॉनचे ट्रेन तिकिट बुकिंग फिचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्रकारच्या अ‍ॅप यूजर्ससाठी उपलब्ध आहे.

एकावेळी किती तिकिट होतील बुक
अमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही एकावेळी 6 लोकांसाठी ट्रेन तिकिट बुक करू शकता. तात्काळ तिकिट बुकिंगच्या प्रकरणात एक ट्रांजक्शनमध्ये 4 लोकांसाठी तिकिट बुक करता येईल. तिकिट प्रवासाच्या 120 दिवस अगोदर अ‍ॅडव्हान्समध्ये बुक करता येऊ शकते.

सुमारे दिड वर्षापूर्वी अमेझॉनने आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे फ्लाइट तिकिट बुक करण्याची सुविधा सुरू केली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2019मध्ये बस तिकिट बुकिंगचे फिचर अ‍ॅड केले. आता कंपनीने ग्राहकांसाठी रिझर्व्ह ट्रेन तिकिट बुक करण्याची सुविधा सुद्धा दिली आहे.

अमेझॉनवर कसे होईल तिकिट बुक
अमेझॉनवर अन्य एक ट्रॅव्हल कॅटगरी देण्यात आली आहे, जेथे ग्राहकांसाठी फ्लाइट, बस आणि ट्रेन तिकिटच्या बुकिंगसाठी वन-स्टॉप-शॉपची सुविधा दिली जाते. येथून तिकिट बुक केल्यानंतर तुम्हाला याच अ‍ॅपवर पीएनआर स्टेट्स चेकिंग, लाइव्ह ट्रेन ट्रॅकिंग, तिकिट डाऊनलोडिंग, कॅन्सलिंगची सुविधा सुद्धा मिळेल. तर, अमेझॉन पे वरून पेमेंट करणार्‍या ग्राहकांना तिकिट कॅन्सल झाल्यास ताबडतोब रिफंड मिळेल. अमेझॉन अ‍ॅपवर अमेझॉन पे टॅबमध्ये ट्रॅव्हल कॅटगरी अंतर्गत फ्लाइट, बस आणि ट्रेन तिकिट बुकिंग फिचर आहे.

अमेझॉनवर ताबडतोब मिळेल रिफंड
अमेझॉन पे बॅलन्सचा वापर करून बुक करण्यात आलेले तिकिट कॅन्सल केल्यास किंवा बुकिंग फेल झाल्यास ग्राहकाला ताबडतोब रिफंड होईल.

कसे आणि कोठून होईल ट्रेन तिकिट
अमेझॉनचे ट्रेन तिकिट बुकिंग फिचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्रकारच्या अ‍ॅप यूजर्ससाठी उपलब्ध आहे. अमेझॉन अ‍ॅप अमेझॉन पे टॅबमध्ये ट्रॅव्हल कॅटगरीअंतर्गत फ्लाइट, बस आणि ट्रेन तिकिट बुकिंग फिचर आहे.

यूजर सहजपणे रेल्वे प्रवासाचा रूट, प्रवासाची तारीख इत्यादी सिलेक्ट करू शकतात आणि त्यांच्या समोर सर्व उपलब्ध ट्रेनची लिस्ट येईल.

पेमेंटसाठी अमेझॉन पे बॅलन्स / अमेझॉन पे आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड किंवा अन्य डिजिटल पेमेंट माध्यमाचा वापर करता येईल. अमेझॉनवरून बुक करण्यात आलेले तिकिट कॅन्सल करण्यासाठी ‘युअर ऑर्डर्स’ सेक्शनमध्ये जाऊन असे करता येईल. बुक झालेले तिकिटसुद्धा याच सेक्शनमध्ये दिसेल.