रेल्वेच्या तिकीट बुकिंगपासून स्वस्तातील गोल्ड बॉन्डपर्यंत, आजपासून झाले हे 4 मोठे बदल, थेट तुमच्या खिश्यावर होणार परिणाम, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान सोमवारपासून म्हणजेच ११ मे २०२० पासून आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित काही गोष्टी बदलत आहेत. आजपासून रेल्वे तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग सुरू होत आहे. तसेच मोदी सरकारने लोकांना स्वस्त सोने खरेदी करण्यासाठी सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना सादर केली आहे. या व्यतिरिक्त बरेच बदल झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडेल. चला जाणून घेऊया आज पासून कोणते मोठे बदल झाले आहेत…
१. रेल्वे तिकिटांचे बुकिंग सुरु- लॉकडाऊन दरम्यान रेल्वेने प्रवाशांना दिलासा देत अनेक मोठ्या मार्गांवर गाड्या सोडणार असल्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्या उद्या १२ मे पासून धावतील. नवी दिल्लीहून या गाड्या दिब्रूगड, अगरतला, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतवीसाठी जाणार आहेत. आज ४ वाजता रिजर्वेशनसाठी बुकिंग सुरू होईल. लक्षात ठेवा स्टेशनवर काउंटरवरून तिकिट मिळणार नाही. प्रवासासाठी तुम्हाला IRCTC वरून ऑनलाईन बुकिंग करावे लागेल. स्टेशनवर काउंटरवरून तिकिट मिळणार नाही. प्रवासासाठी IRCTC वरून ऑनलाईन बुकिंग करावे लागेल.
२. स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी- ११ मेपासून सॉव्हरेन गोल्ड बाँड २०२०-२१ सिरीज-२ जारी झाली आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या हप्त्यासाठी इश्यू प्राइस प्रति ग्रॅम ४,५९० रुपये निश्चित केली आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना २०२०-२१ ची सिरीज-२ च्या सब्स्क्रिप्शनसाठी ११ मे २०२० ते १५ मे २०२० कालावधीत खुली असेल. पहिल्या सिरीजची इश्यू प्राईस प्रति ग्रॅम ४,६३९ रुपये होती. आरबीआयने गेल्या महिन्यात म्हटले होते की सरकार २० एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत सहा टप्प्यात सॉव्हरेन गोल्ड बॉंड जारी करेल.
३. युनियन बॅंकेचे कर्ज स्वस्त- सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स आधारित लोडींग दरात सर्व कार्यकाळ किंवा टेनर्ससाठी ०.०५% – ०.१५% कपात केली आहे. नवीन दर ११ मे २०२० पासून लागू झाले. ओव्हरनाईट एमसीएलआरला १५ बेसिस पॉईंट्सवरून ७.१५%, एक महिन्याच्या एमसीएलआरला १० बेसिस पॉईंट्सवरून ७.२५%, ३ महिन्यांत आणि ६ महिन्यांचा एमसीएलआर ५ बेसिस पॉईंट्सवरून ७.४०% आणि ७.५५% पर्यंत केला आहे. बँकेने एक वर्षाचे एमसीएलआर ७.७५% वरून ७.७०% केले आहे. सुधारित एमसीएलआर ११ मे २०२० पासून लागू होईल. जुलै २०१९ पासून बँकेकडून जाहीर केलेल्या दरात ही सलग अकरावी घट आहे. यापूर्वी देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयनेही एमसीएलआरमध्ये कपात करण्याची घोषणा केली होती.
४. ८ किंवा ९ अंकाचे जनधन खातेदार दुसऱ्या हप्त्यात पैसे काढू शकतात- लॉकडाऊमध्ये गरिबांना रेशन आणि आर्थिक मदत देण्याची योजना चालू आहे. पंतप्रधान जनधन योजने (पीएम जनधन योजना) अंतर्गत महिला खातेदारांच्या खात्यात सरकारने ५०० रुपयांचा आणखी एक हप्ता टाकण्यास सुरूवात केली आहे. या महिन्यात आतापर्यंत १० कोटीहून अधिक जनधन महिला खातेदारांच्या खात्यात दुसरा हप्ता जोडला आहे. ४ मेपासून खाते क्रमांकानुसार हे पैसे काढण्याची सुविधादेखील देण्यात आली होती. ११ मे पर्यंत ८ किंवा ९ अंकी खातेदार आपले पैसे काढू शकतात.