IPS अधिकारी बनल्यानंतर हवी होती दुसरी पत्नी, अत्याचाराची FIR, केलं ‘निलंबन’

पोलीसनामा ऑनलाईन : पत्नीचा छळ केल्याचा आरोप समोर आल्यानंतर प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. २८ वर्षीय आयपीएस कोक्कंती महेश्वर रेड्डी याच्यावर पत्नीनचा घटस्फोटासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे, जेणेकरुन तो पुन्हा लग्न करू शकेल. रेड्डीची पत्नी बिरुदला भावना यांनी याप्रकरणी हैद्राबाद पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील रहिवासी रेड्डीनी यंदा यूपीएससी परीक्षेत १२६ वा क्रमांक मिळविला होता. आयएएनएसनुसार, सध्या तो मसूरी येथील लाल बहादुर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन येथे प्रशिक्षण घेत होता. यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच रेड्डीने त्याच्या पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली. जेणेकरून तो दुसर्‍या बाईशी लग्न करु शकेल.

भावनाने सांगितल्याप्रमाणे, कॉलेजच्या काळापासूनच त्यांचे एकमेकांशी संबंध होते, ९ फेब्रुवारी २००८ रोजी त्यांचे विवाह कार्यालयात औपचारिकपणे लग्न झाले होते. भावना भारतीय रेल्वेमध्ये काम करते. तिने दिलेल्या तक्रारीनंतर हैद्राबाद पोलिसांनी छळ आणि गुन्हेगारी धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय एससी / एसटी कायदा देखील लागू करण्यात आला.

 

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/