वीजेच्या तारांमध्ये अडकलं विमान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या अलिगढ धनीपूरमध्ये एक खाजगी विमान पडल्याची घटना घडली आहे. ट्रेनर एयरक्राफ्ट VT-AVV धनीपूरच्या भागात क्रॅश झाले. या क्रॅशमध्ये सुदैवाने कोणीही दगावलेले नाही. विमानातील सर्वजण सुरक्षित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सहा सीटर प्रायव्हेट जेट विमान होते. यामध्ये प्रवास करणारे सहाही जण सुरक्षित आहेत. धनीपूर येथील गांधी पार्कच्या लँडिंग करण्याच्या ठिकाणी उतरत असताना ही दुर्घटना झाली. विद्युत तारांमध्ये अडकल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे समजते आहे. विद्युत तारांच्या संपर्कात आल्यामुळे विमानाला आग लागली आणि विमान लँडिंग करताना क्रॅश झाले.

सूचना मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. खाजगी विमान दुरुस्त करणारे अधिकारी दिल्लीहून अलिगढ या ठिकाणी विमानातून येत होते त्यावेळी ही दुर्घटना झाली.

आरोग्यविषयक वृत्त –