भाजपाचे बूथ प्रमुख प्रशिक्षण वर्ग नामांकित महाविद्यालयात आ. राम पाटील रातोळीकर यांच्या उपस्थितीत संपन्न

0
16

भोकर: पोलीसनामा ऑनलाईन 

माधव मेकेवाड

काँग्रेस पक्षाचे भोकर विधान सभेमध्ये असलेले वर्चस्व लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाचे धागे दोरे सर्व स्थरावर असावे म्हणून भाजपाचे दिग्गज नेते मंडळींनी या बैठकीला हजेरी लावलेली दिसून आली या विधान सभा व लोकसभेत अशोक चव्हाण यांना मतपरिवर्तनसाठी लक्ष वेधण्याचा अधिक शक्ती खर्च करावी लागावी यासाठी भाजपा पार्टी कडून प्रचार व प्रसार त्याच बरोबर बूथ प्रमुखाची जबाबदारीचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7fcfe2df-c896-11e8-b4a4-318095f703ff’]
भारतीय जनता पार्टी नांदेड पंडित दिनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजनेच्या माध्यमातून बूथ प्रमुख प्रशिक्षण वर्ग दि ०३ रोजी दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर ता भोकर जिल्हा नांदेड येथिल कै. स्व.भुंजगराव किन्हाळकर यांच्या नामे सभागृहात उद्धघाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला मराठवाडा संघटन मंत्री भाऊरावजी देशमुख, मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉ माधवराव किन्हाळकर, जिल्हाध्यक्ष व आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हा संघटक सरचिटणीस गंगाधरराव जोशी, जिल्हा परिषद सदस्य सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, लोकनेते नागनाथ राव घिसेवाड,कोषाध्यक्ष बालाजीराव देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष लोकसभा विस्तारक रविंद्र पोतगंटीवार, जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, राजेश महाराज, विधानसभा विस्तारक अरुण सुकळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुभाष किन्हाळकर, गणेशराव कापसे, राजेश अंगरवाड, जिल्हा परिषद सदस्य दिवाकर रेड्डी, ओबिसी जिल्हाध्यक्ष राजेश करपे, पंचायत समिती सदस्या प्रतिनिधी गणपत जाधव, कृष्णाजी देशमुख, तालुका अध्यक्ष गणपत पिटेवाड, सरचिटणीस बाळासाहेब साकळकर, शहराध्यक्ष संतोष मारकवार, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस प्रशांत पोपशेटवार, राज्य विधान परिषद सदस्य प्रकाश मामा कोंडलवार, साबळे ताई,सर्व बुथ प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख प्रशिक्षण वर्गात उपस्थित होते.

यावेळी अनेकांनी उपस्थिती दाखवली व विद्यमान आमदार असलेले विधान परिषद चे राम पाटील रातोळीकर यांनी सर्वाना मार्गदर्शन यावेळी केली.