मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील रेल्वे गाड्या 29 ऑगस्टपर्यंत रद्द !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर दौंड सेक्शनमधील वडशिंगे ते भाळवणी या ३५ किलोमीटर अंतरावरील दुहेरीकरण आणि सग्नल जोडण्याची कामे सुरु आहेत. त्यामुळे २७ ऑगस्टपर्यंत या मार्गावरून धावणाऱ्या ६२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर १२ गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच १० रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

‘या’ रेल्वे गाड्यांचे २४ ऑगस्ट पर्य़ंत मार्ग बदलले
नागरकोई- मुंबई, मुंबई-नागरकोई, मुंबई-त्रिवेंद्रम, त्रिवेंद्रम-मुंबई, मुंबई-तिरुपती, तिरुपती-मुंबई, मुंबई-भुवनेश्वर, भुवनेश्वर-मुंबई, मुंबई-हैद्राबाद, हैद्राबाद-मुंबई हुसेनसागर एक्सप्रेस आणि भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेसचे मार्ग २४ ऑगस्टपर्यंत बदलण्यात आले आहेत.

२४ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्या
मुंबई-गदग, गदग-मुंबई, हैद्राबाद-पुणे, पुणे-हैद्राबाद, बेंगलोर-मुंबई, मुंबई-बेंगलोर उद्यान एक्सप्रेस मिरज, कुर्डुवाडी, कुर्डुवाडी-मिरज, एलटीटी-विशाखापट्टणम एक्सप्रेस आणि निजामाबाद-पंढरपूर एक्सप्रेस २४ ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

रद्द झालेल्या प्रमुख गाड्या (कंसात कालावधी)
पुणे-सोलापूर, सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस (२० ते २३ ऑगस्ट), सोलापूर-पुणे, पुणे-सोलापूर इंटरसिटी (इंद्रायणी) एक्सप्रेस (१७ ते २९ ऑगस्ट), भुवनेश्वर-पुणे, पुणे-भुवनेश्वर एक्सप्रेस (२० आणि २२ ऑगस्ट),पुणे- सोलापूर व सोलापूर- पुणे डेमू पॅसेंजर (१६ ते २९ ऑगस्ट), साईनगर- पंढरपूर, पंढरपूर- साईनगर एक्‍स्प्रेस (१५,१८,२०,२२ व २५ ऑगस्ट), सोलापूर- कोल्हापूर, कोल्हापूर- सोलापूर (१८ ते २२ ऑगस्ट), हैदराबाद- मुंबई, मुंबई- हैदराबाद एक्‍स्प्रेस (१६ ते २३ ऑगस्ट), सोलापूर- मिरज, मिरज- सोलापूर एक्‍स्प्रेस (१८ ते २३ ऑगस्ट), मुंबई- पंढरपूर व पंढरपूर- मुंबई फास्ट पॅसेंजर (१५ ते १८ व २२ ते २५ ऑगस्ट), मुंबई- विजयपूर, विजयपूर- मुंबई फास्ट पॅसेंजर (१८ ते २२ व २५, २६ ऑगस्ट) या प्रमुख गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like