Lockdown 3.0 : 15 मार्गावर धावणार्‍या रेल्वे गाडयांची संपुर्ण यादी, कोणती ट्रेन ‘कधी-कुठं’ जाणार, जाणून घ्या वेळापत्रक

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन  – देशभरात लॉकडाउन सुरू असताना 12 मेपासून रेल्वे सेवा अंशत: सुरू होणार आहे. देशातल्या 15 भागांकडून दिल्लीकडे आणि दिल्लीतून 15 भागांमध्ये जाणाऱ्या मार्गांवर या रेल्वे धावणार आहेत. आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून तिकिटं आरक्षित करता येतील. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून दिब्रुगड, आगरताळा, हावडा, पाटणा, विलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू-तवी या शहरांदरम्यान या रेल्वे धावणार असून त्यापैकी काही रेल्वे वगळता इतर रेल्वे दररोज धावतील.

12 मेपासून सुरू होणाऱ्या रेल्वेगाड्या

हावडा (1650) – नवी दिल्ली (1000)

राजेंद्रनगर (1900) – नवी दिल्ली (0740)

नवी दिल्ली (1610) – दिब्रुगड (0700)

नवी दिल्ली (2040) – जम्मू तवी (0545)

बेंगळुरू (2000) – नवी दिल्ली (0555)

नवी दिल्ली (1545) – विलासपूर (1200) टी, एस

मुंबई सेंट्रल (1700) – नवी दिल्ली (0835)

अहमदाबाद (1740) – नवी दिल्ली (0730)

13 मेपासून सुरू होणाऱ्या रेल्वेगाड्या

नवी दिल्ली (1655) – हावडा (0955)

नवी दिल्ली (1715) – राजेंद्रनगर (0530)

जम्मूतवी (1940) – नवी दिल्ली (0500)

नवी दिल्ली (1055) – तिरुअनंतपुरम (525) मं., बु. र.

नवी दिल्ली (1555) – चेन्नई सेंट्रल (2040) बु. श.

नवी दिल्ली (1600) – रांची (1030) बु. श.

नवी दिल्ली (1625) – मुंबई सेंट्रल (0815)

नवी दिल्ली (1955) – अहमदाबाद (0940)

भुनवेश्वर (0930) – नवी दिल्ली (1045)

14 मेपासून सुरू होणाऱ्या रेल्वेगाड्या

दिब्रुगड (2035) – नवी दिल्ली (1015)

नवी दिल्ली (2045) – बेंगळुरू (0640)

विलासपूर (1400) – नवी दिल्ली (1055) सो. गु.

रांची (1710) – नवी दिल्ली (1055) गु. र.

नवी दिल्ली (1705) – भुवनेश्वर (1725)

15 मेपासून सुरू होणाऱ्या रेल्वेगाड्या

तिरुअनंतपुरम (1915) – नवी दिल्ली (1240) मं.,गु.,शु.

चेन्नई सेंट्रल (0605) – नवी दिल्ली (1025) शु. र.

नवी दिल्ली (1055) – मडगाव (1250) शु. र.

17 मेपासून सुरू होणाऱ्या रेल्वेगाड्या

मडगाव (1000) – नवी दिल्ली (1240) सो. र.

नवी दिल्ली (1555) – सिकंदराबाद (1400) र.

18 मेपासून सुरू होणाऱ्या रेल्वेगाड्या

आगरताळा (1830) – नवी दिल्ली (1120) सो.

20 मेपासून सुरू होणाऱ्या रेल्वेगाड्या

नवी दिल्ली (1950) – आगरताळा (1330) बु.

सिकंदराबाद (1245) – नवी दिल्ली (1040) बु.

या रेल्वेंमध्ये डब्यातील संपूर्ण 72 सीटसाठी बुकिंग केलं जाणार असून, मजुरांसाठीच्या विशेष रेल्वेंप्रमाणे या रेल्वेंच्या तिकीट भाड्यामध्ये कोणतीही सूट मिळण्याची शक्यता नाही. (333)