मुंबई गोवा महामार्गावर रोडबरोबर आता रेल्वेही रुसली

रोहा : पोलीसनामा ऑनलाईन 

मुंबई -गोवा महामार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास महाडजवळील केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्याने महामार्ग ठप्प झाला होता. त्यापाठोपाठ आता रोह्याजवळ मुंबई -गोवा रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घरसल्याने हाही मार्ग बंद पडला आहे.

सुमारे ४ तासाच्या प्रयत्नाने दरड हटविल्यानंतर मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सुरु झाली असली तरी वाहनांची रांगा लांबवर लागल्या आहेत.

दरम्यान, मुंबई -गोवा रेल्वे मार्गावर रोहा रेल्वे स्टेशनजवळ एका मालगाडीचे इंजिन बंद पडले. त्याचवेळी डब्यांची चाके रुळावरुन घसरली आहे. विशेष म्हणजे हा अपघात रेल्वे फाटकाजवळ घडला आहे. त्यामुळे रेल्वे फाटक बंद झाले असून रोहा अलिबाग मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे.

पेणमध्येही एक बस बंद पडल्याने तेथेही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे रस्ता आणि रेल्वे अशा दोन्ही मार्गावर वाहतूकीचा बोजवारा उघडला आहे.

जाहिरात