राज्यातील 18 पोलिस अधीक्षक /सहाय्यक पोलिस आयुक्‍तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (सोमवार) तब्बल 18 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्‍तांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी काढले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापुर्वी राज्य पोलिस दलात मोठया प्रमाणावर बदल्या झाल्या होत्या.

आज 18 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत.बदल्या झालेल्या पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्‍तांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे.

श्रीमती अरूंधती अरूण राणे (आयजी, नाशिक परिक्षेत्र यांचे वाचक ते उपविभागीय अधिकारी, नाशिक ग्रामीण उपविभाग, नाशिक ग्रामीण), श्रीमती प्रांजली सोनावणे (उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर ते उपविभागीय अधिकारी, कर्जत उपविभाग, अहमदनगर), राजेंद्र वामन ससाणे (पोलिस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक ते उपविभागीय अधिकारी, अमळनेर उपविभाग, जळगांव), संजय गुलाबराव देशमुख (उप अधीक्षक, जिल्हा जात पडताळणी समिती, नंदुरबार ते उपविभागीय अधिकारी, मुक्‍ताईनगर उपविभाग, जळगांव), श्रीमती आरती बनसोडे (उप अधीक्षक, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद ते उपविभागीय अधिकारी, गंगापूर उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण), सोपान ज्ञानोबा बांगर (पोलिस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जालना ते उपविभागीय अधिकारी, परतूर उपविभाग, जालना), सतिय मोरेश्‍वर देशमुख (पोलिस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नांदेड ते उपविभागीय अधिकारी, वसमत उपविभाग, हिंगोली), भरतकुमार मुदिराज (उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, हिंगोली ते उपविभागय अधिकारी, भोकर उपविभाग, नांदेड), सोपान सतबाजी मोरे (उप अधीक्षक, मुख्यालय, परभणी ते उपविभागीय अधिकारी, परभणी ग्रामीण उपविभाग, परभणी), प्रकाश केशव एकबोटे (उप अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, नाशिक ते उपविभागीय अधिकारी, सेलू उपविभाग, परभणी), मुजा महादेव मुळे (उप अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, औरंगाबाद ते उपविभागीय अधिकारी, जिंतूर उपविभाग, परभणी), राजेंद्र शंकरराव चव्हाण (उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ते उपविभागय अधिकारी, नागपूर ग्रामीण उपविभाग, नागपूर ग्रामीण), तुकाराम खंडु काटे (उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, भंडारा ते उपविभागीय अधिकारी, साकोली उपविभाग, भंडारा), संतोषसिंग उत्‍तमसिंग बिसेन (उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर ते उपविभागीय अधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा), रमेश भागवतराव तायवडे (उप अधीक्षक, पोलस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते उपविभागीय अधिकारी, मूल उपविभाग, चंद्रपूर), सरदार नामदेव पाटील (उप अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, नागपूर ते उपविभागीय अधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर), संजय बाबुराव काळे (पोलिस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण ते उपविभागीय अधिकारी, धारणी उपविभाग, अमरावती ग्रामीण) आणि सुनिल दादासाहेब मोरे ( उप अधीक्षक, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती ते उपविभागीय अधिकारी, दर्यापूर उपविभाग, अमरावती ग्रामीण).

आदेशामध्ये शासनाने संबंधित घटक प्रमुखांना बदली झालेल्या अधिकार्‍यांना तात्काळ कार्यमुक्‍त करावे असे सांगितले असून इतर काही सुचना दिलेल्या आहेत.