राज्यातील २ उप अधिक्षक / सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील २ पोलीस उपअधिक्षक व सहायक पोलीस आयुक्त (निशस्त्र) संवर्गातील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी काढले आहेत.

बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि त्या पुढील कंसात कोठून कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे :-
जालिंदर सुदाम नालकुल (उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग, रायगड ते उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव उपविभाग, गोंदीया) आणि अनिल तुकाराम घेरडीकर (कांबळे) (उपविभागीय पोलीस अधिकारी, जिंतूर उपविभाग, परभणी), ते उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग, रायगड).