11 पोलिस निरीक्षकांसह 20 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 पोलिस अधीक्षकांसह 20 अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी याबाबत आज दुपारी बदली आदेश काढला आहे.

बदल्यांमध्ये अकोले, राहाता, शिर्डी, जामखेड, सायबर, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास नवीन प्रभारी अधिकारी मिळाले आहेत. इतर शाखांमध्येही फेरबदल करण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे: पोनि गोकुळ रुस्तमराव औताडे- शिर्डी पोलिस स्टेशन येथीून वाचक, शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोनि अरुण भगीरथ परदेशी- राहाता पो. स्टे. येथून सायबर पो. स्टे., पोनि पांडुरंग विठ्ठल पवार- जामखेड पो. स्टे. येथून वाचक पोलीस अधीक्षक कार्यालय, नगर, पोनि हनुमंतराव झुंबरराव गाडे- अकोले पो. स्टे. येथून शिर्डी साई मंदिर सुरक्षा, पोनि प्रविणचंद्र विश्वासराव लोखंडे- कोपरगाव तालुका पो.स्टे. येथून आर्थिक गुन्हे शाखा, सपोनि दिपक गोविंद गंधाले- शिर्डी पो. स्टे. येथून प्रभारी अधिकारी शिर्डी पो. स्टेे, पोनि सुभाष दादा भोये- साईमंदिर सुरक्षा येथून राहाता पो. स्टे., पोनि प्रभाकर भाऊराव पाटील- सायबर पो. स्टे. येथून जामखेड पो. स्टे., पोनि अरविद बळीराम जोंधळे- नियंत्रण कक्ष येथून अकोले पो. स्टे., पोनि अनिल बबनराव कटके- वाचक पोलीस अधीक्षक कार्यालय येथून कोपरगाव तालुका पो. स्टे., पोनि दिलीप मनोहर निघोट- आर्थिक गुन्हे शाखा येथून नियंत्रण कक्ष.

पोलीस उपनिरीक्षकांच्या नवीन नियुक्त्या पुढीलप्रमाणे : मपोउपनि संगिता विलास गिरी- साई मंदिर सुरक्षा, पोउपनि विनोद जगन्नाथ जाधोर- जिल्हा विशेष शाखा, पोउपनि नयन छबुलाल पाटील- आश्वी पो. स्टे., पोउपनि रोहिदास अशोक माळी- संगमनेर शहर, पोउपनि रितेश नाना राऊत- नगर तालुका, पोउपनि प्रदीप कारभारी शेवाळे- नेवासा, पोउपनि दत्तात्रय बाळु उजे- श्रीरामपूर शहर, पोउपनि पंकज प्रकाश निकम- राहुरी, पोउपनि सतिष नामदेव शिरसाठ- कोतवाली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like