पश्‍चिम महाराष्ट्र : 5 जिल्ह्यातील 22 पीआय, 12 एपीआयच्या बदल्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील 5 जिल्हयातील 22 पोलिस निरीक्षक आणि 12 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या सोमवारी रात्री बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी बदल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

बदली झालेल्या पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे.

पोलिस निरीक्षक :- संजय ज्ञानदेव सुर्वे (सोलापूर ग्रामीण ते सांगली), दिलीप बबनराव लुकडे (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), सुधाकर भिमराव कोरे (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), ईश्‍वर दौलतराव ओमासे (सोलापूर ग्रामीण ते कोल्हापूर), आनंदराव तुकाराम खोबरे (सोलापूर ग्रामीण ते सातारा), कल्‍लाप्पा सत्‍तु पुजारी (सांगली ते सोलापूर ग्रामीण), प्रताप धोंडीराम पोमण (सांगली ते सातारा), रविंद्र गणपतराव डोंगरे (सांगली ते सोलापूर ग्रामीण), प्रकाश दामोदर गायकवाड (सांगली ते कोल्हापूर), ए.ए. भवड (सांगली ते सोलापूर ग्रामीण), युवराज मारूती मोहिते (सांगली ते पुणे ग्रामीण), दत्‍तात्रय गणपत नाळे (सातारा ते सोलापूर ग्रामीण), चंद्रकांत शंकरराव बेदरे (सातारा ते सांगली), पांडुरंग मारूती सुतार (पुणे ग्रामीण ते सांगली), भागवत विठ्ठलराव मुंढे (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), मुगुटलाल भानुदास पाटील (पुणे ग्रामीण ते सातारा), बिपिन व्यंकटेश हसबनीस (कोल्हापूर ते सांगली), संदीप किसनराव भागवत (कोल्हापूर ते सातारा), औदुंबर भालचंद्र पाटील (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण), विश्‍वास हरिभाऊ साळोखे (सांगली ते सोलापूर ग्रामीण), आण्णासाहेब बाळासाहेब घोलप (सातारा ते पुणे ग्रामीण) आणि सुहास लक्ष्मण जगताप (सोलापूर ग्रामीण ते कोल्हापूर)

सहाय्यक पोलिस निरीक्षक :- महेश शिवलिंग भावीकट्टी (सोलापूर ग्रामीण ते सातारा), शाम विनायक बुवा (सोलापूर ग्रामीण ते सातारा), अविनाश ज्ञानेश्‍वर माने (सोलापूर ग्रामीण ते कोल्हापूर), कुमार गुलाब घाडगे (सोलापूर ग्रामीण ते सातारा), संतोष दत्‍तगिरी गोसावी-इनामदार (सातारा ते सांगली), बबन भागुजी येडगे (सातारा ते सोलापूर ग्रामीण), अनिल किसन गुजर (सातारा ते पुणे ग्रामीण – अकार्यकारी पदावर), बजरंग शामराव कापसे (सातारा ते सोलापूर ग्रामीण), संगिता शशिकांत माने (कोल्हापूर ते सातारा), संजय अकाराम हारूगडे (कोल्हापूर ते सांगली), सुधीर आनंदराव तोरडमल (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण) आणि अरविंद बाळू काटे (पुणे ग्रामीण ते सांगली).