राज्यातील 3 सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  भारतीय प्रशासकीय सेवेतील 3 सनदी अधिकाऱ्यांच्या आज (शुक्रवार) बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची बदली करण्यात आली आहे. यांच्यासह तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढे कोठून कोठे बदली झाली

1. मनिषा पाटणकर-म्हैसकर – प्रधान सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांना पर्यावरण सचिव, मंत्रालय, मुंबई यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2. आशुतोष सलील – सह आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

3. श्रीकृष्णनाथ पांचाळ – सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी ITDP भंडारा यांना मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद यवतमाळ येथे नियुक्त करण्यात आले आहे.