3 अप्पर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (मंगळवारी) 3 अप्पर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी अप्पर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा दोन अप्पर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली झालेल्या अप्पर पोलिस अधीक्षकांचे नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे. अमोल तांबे (अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण-बदली आदेशाधिन ते पोलिस उपायुक्‍त, नाशिक शहर) आणि अतुल झेंडे (पोलिस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, महाराष्ट्र राज्य ते अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण). सध्या नाशिक आयुक्‍तालयात कार्यरत असलेले उपायुक्‍त श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.