राज्यातील ४ पोलीस उप अधीक्षक / सहाय्यक आयुक्‍तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (गुरूवार) पोलीस उप अधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्‍त दर्जाच्या 4 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर सोमवार पासुन राज्यातील पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जात आहेत. आज 4 अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय रघुनाथ धोपावकर (बृहन्मुंबई) यांना सहाय्यक पोलिस आयुक्‍तपदी बढती देण्यात आली असुन त्यांची सहाय्यक पोलिस आयुक्‍त म्हणून नागपूर शहर येथे बदली करण्यात आली आहे. बीड जिल्हयातील बीड उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर अशोक खिरडकर यांची नांदेड येथे राज्य गुप्‍तवार्ता विभागात बदली करण्यात आली आहे तर सहाय्यक पोलिस आयुक्‍त अ‍ॅन्थोनी स्टिवन मॅथ्युज यांची मुंबईतील दहशतवादी विरोधी पथकात पोलीस उप अधीक्षक म्हणुन नियुक्‍ती करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी राजेंद्र शंकर रायसिंग यांची फैजपूर उपविभाग (जळगांव) येथे बदली झाली होती. मात्र, त्याऐवजी त्यांची आता परभणी जिल्हयातील सेलू उपविभागात उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हयातील आमगांव उपविभागात कार्यरत असलेले राजीव धुराजी नवले यांची लातूर जिल्हयातील औसा उपविभागात उपविभागीय अधिकारी म्हणुन बदली करण्यात आली आहे.