राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल ! 9 अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या, नागपूर आणि नवी मुंबईचे आयुक्त बदलले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   गणेशोत्सवानंतर राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. राज्याच्या गृह विभागानं राज्यातील 9 अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये नागपूर आणि नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या अति वरिष्ठ अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे.

1. राजेंद्र सिंह (अप्पर पोलिस महासंचाल (विशेष अभियान), पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई ते अप्पर पोलिस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, महासंचालक कार्यालय, मुंबई)

2. आशुतोष डुंबरे (अप्पर पोलिस महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन विभाग, मुंबई ते आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, महाराष्ट राज्य, मुंबई)

3. अमितेश कुमार ( सह आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, मुंबई ते पोलिस आयुक्त नागपूर, शहर – पदोन्नतीने)

4. जय जीत सिंह ( अप्पर पोलिस महासंचालक, रेल्वे, महाराष्ट्र राज्य , मुंबई ते अप्पर महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई)

5. व्हि.के. चौबे ( सह पोलिस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, मुंबई शहर (अप्पर पोलिस महासंचालक दर्जा) ते अप्पर पोलिस महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई)

6. सदानंद दाते (केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आल्याने प्रतिक्षाधीन ते पोलिस आयुक्त, मिरा भाईंदर वसई विरार, पोलिस आयुक्तालय)

7. भुषण कुमार उपाध्याय (पोलिस आयुक्त, नागपूर शहर ते अप्पर पोलिस महासंचालक, वाहतूक, पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई)

8. संजय कुमार (पोलिस आयुक्त, नवी मुंबई ते अप्पर पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, पोलिस महासंचालक, मुंबई)

9. बिपिन कुमार सिंह (अप्पर पोलिस महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलिस आयुक्त, नवी मुंबई)