राज्य पोलीस दलातील पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या, पुण्यात 5 DCP आणि 7 ACP ची नियुक्ती

पुणे :पोलिसनामा ऑनलाइन – राज्यातील वरिष्ठ पोलीस (police) अधिकाऱ्यांसह सहाय्यक पोलिस (police) आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश मध्यरात्री गृहविभागाने काढले. यात पुणे शहरात पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त बदलून आले आहेत. मात्र, पुण्यातून एकाही अधिकाऱ्यांची बदली अद्याप झालेली नाही. त्यामुळे पोलीस उपायुक्त यांची संख्या जास्त झाली आहे.

अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांची पुणे प्रशासन येथून पुणे शहर दक्षिण प्रादेशिक विभागात बदली करण्यात आली आहे.

भाग्यश्री नवटके –           पुणे आर्थिक व सायबर गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त.
सागर नेताजी पाटील  –  परिमंडळ 2
नम्रता पाटील-चव्हाण –  परिमंडळ 5
राहुल श्रीरामे –               परिमंडळ-4
निलेश अष्टेकर –            पीएमआरडीए- पुणे
सदानंद वायसे –            पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे

सहाय्यक आयुक्त

पौर्णिमा तावरे –            पुणे शहर
किशोरकुमार जाधव –  पुणे शहर
राजेंद्र गलांडे –              पुणे शहर
सुषमा चव्हाण –           पुणे शहर
सुनील पवार –              पुणे शहर
रमेश गलांडे –               पुणे शहर
गजानन टोपे  –            पुणे शहर

ग्रामीण–

धनंजय पाटील- भोर उपविभ-  पोलीस उपअधीक्षक
राहुल धस-       दौड विभाग-   पोलीस उपअधीक्षक
मंदार जवळे-     जुन्नर विभाग- पोलीस उपअधीक्षक
अनिल लभाते-  खेड विभाग-   पोलीस उपअधीक्षक

पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक दीपक साकोरे यांची नागपूर येथील मानवी हक्क संरक्षण विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. तर मंगेश शिंदे यांची सीआयडीत बदली करण्यात आली आहे. संजय जाधव यांची पुणे राज्य महामार्ग येथे पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.