राज्यातील ७ पोलीस उप अधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ७ पोलीस उप अधिक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (निशस्त्र) संवर्गातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहमंत्रालयाने शुक्रवारी काढले आहेत.

बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि त्या पुढील कंसात कोठून कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे :-
हिम्मत जाधव (पोलीस अधिक्षक विशेष कृती दल, नागपूर ते अप्पर पोलीस अधिक्षक, लातूर), काकासाहेब डोळे (अप्पर पोलीस अधिक्षक, लातूर ते प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर), घनश्याम पाटील (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर ते पोलीस अधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक), विद्यानंद मुरलीधर काळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, दर्यापूर उपविभाग, अमरावती ते उपविभागीय पोलीस अधिकारी, चाकूर उपविभाग, लातूर), सुधीर खिरडकर (उपविभागीय पोलीस अधिकारी, दर्यापूर उपविभाग, अमरावती या पदावरून राज्य गुप्तवार्ता विभाग, नांदेड( बदली आदेशाधीन) ते उपविभागीय पोलीस अधिकारी जालना उपविभाग, जालना), संजय वेर्णेकर (उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर रेल्वे उपविभाग ( पदोन्नतीने पदस्थापनेच्या आदेशाधीन) ते सहायक पोलीस आयुक्त मुंबई शहर), राजेंद्र शंकर रायसिंग (उपविभागीय पोलीस अधिकारी, सेलू उपविभाग, परभणी (बदली आदेशाधीन), ते पोलीस उपअधिक्षक, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती).

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us