मोक्क्यातील आरोपीला सन्मानाची वागणूक, अधीक्षकाची तडकाफडकी बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोक्क्यातील आरोपीला सन्मानाची वागणूक देणे कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांना भोवली आहे. शेळकेची कळंबा कारागृहाच्या अधीक्षकपदावरुन पुण्यात येरवडा येथील प्रशिक्षण महाविद्यालयात तुरुंगाधिकारी म्हणून बदली केली आहे.

शेळके यांच्या जागेवर विसापूर खुले कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे यांची नियुक्ती केली आहे.
शरद शेळके हे गेल्या तीन वर्षांपासून कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक होते. कारागृहातील बंदी संतोष पोळ याने पिस्तूल हातात घेऊन व्हिडिओ शुटिंग केले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची यापूर्वी बदली करण्यात आली होती.

या प्रकरणाच्या चौकशीत त्यांना क्लीन चिट मिळल्यानंतर त्यांना पुन्हा कळंबा कारागृहात बदली केली होती. मोक्कातील आरोपींना सन्मानाची वागणूक दिल्याप्रकरणी त्यांची बदली केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात तीन अधिकाऱ्यांसह १५ जणांची चौकशी सध्या सुरु आहे.