तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी निवडणूकांअगोदरच बदली सत्र सुरू झाल्याने अधिकाऱ्यांस पदभार सांभाळणे अवघड जाणार असल्याची शहरात चर्चा सध्या सुरू आहे. नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांची बदली बीडचे तहसीलदार म्हणून करण्यात आली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील अरूण जरहाड हे अंबेकर यांच्या जागी नांदेडचे तहसीलदार म्हणून येणार आहेत. हदगावच्या तहसीलदार वंदना निकुंभ यांचीही बदली झाली असून त्यांना परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक या रिक्त पदावर पाठवण्यात आले आहे. धर्माबादच्या तहसीलदार ज्योती चव्हाण यांची बदली परभणी जिल्ह्यातील पालम येथे करण्यात आली आहे.

पालम येथील तहसीलदार संतोषी देवकुळे यांच्या रिक्त जागी त्या पदभार स्वीकारणार आहेत. नांदेड येथील रोहयो उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांची बदली हिंगोलीच्या रोहयो उपजिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. धान्य घोटाळ्यात फरार असलेले निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांच्या बदलीचे आदेशही ६ सप्टेंबर २०१९ रोजी निघाले आहेत. त्यांना परभणी येथे विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. जिल्ह्यात तहसीलदारांच्या बदल्याही झाल्या असून त्यात नांदेड, हदगाव आणि धर्माबाद तहसीलदारांचा समावेश आहे.