राज्यातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने बुधवारी राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे तसेच बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना नियंत्रक अधिकारी यांनी तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या महाराष्ट्राचे उप सचिव कैलास गायकवाड यांच्या आदेशाने करण्यात आल्या आहेत.


बदली करण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढे कोठून कोठे बदली झाले ते ठिकाण…
1. अखिलेश कुमार सिंह – पोलीस उपायुक्त, परिमंडळ-7 मुंबई शहर ते पोलीस अधीक्षक अहमदनगर
2. अभिषेक त्रिमुखे – सहायक पोलीस महानिरीक्षक (नि.व.स) मुंबई ते पोलीस उपायुक्त, मुंबई शहर

You might also like