राज्यातील 13 IAS अधिकार्‍यांच्या बदल्या !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    राज्य शासनाने शुक्रवारी 13 आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या (officers) बदल्या (transfer) केल्या होत्या. गेले काही दिवस आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. या निमित्ताने नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्या तरी बहुचर्चित अधिकारी तुकाराम मुंढे हे अजूनही प्रतीक्षेतच आहेत. यापूर्वी सोमवारी देखील 15 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे

1. व्ही. एस मून – (अध्यक्ष जात पडताळणी समिती, चंद्रपूर ते मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. भंडारा)

2. विवेक जॉन्सन – (सहाय्यक जिल्हाधिकारी, भंडारा ते सहाय्यक जिल्हाधिकारी, यवतमाळ)

3. एम.बी बारभुवन – (प्रतिक्षेत ते सहसचिव, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय)

4. भाग्यश्री विसपुते – (सहाय्यक जिल्हाधिकार, यवतमाळ ते मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बुलढाणा)

5. अमगोथू श्रीरंगा नायक – (आयुक्त, मनरेगा, नागपूर ते सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई)

6. ए.जी. रामोड – (अध्यक्ष, जात पडताळणी समिती उस्मानाबाद ते अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे)

7. बुवनेश्वरी एस – ( मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बुलडाणा ते मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी नागपूर)

8. शनमुगराजन एस – ( मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बुलडाणा ते जिल्हाधिकारी वाशिम)

9. मनीष खत्री – ( सदस्य सचिव, विदर्भ विकास मंडळ, नागपूर ते संचालक, वनामती नागपूर)

10. दिलीप हळदे – (व्यव.संचालक राज्य सहकारी पणन महासंघ ते संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे)

11. नवीन सोना – (व्यव. संचालक कापूस उत्पादक पणन महासंघ ते सदस्य सचिव उर्वरित महाराष्ट्र पणन महासंघ, मुंबई

12. ए.बी. उन्हाळे – (प्रतिक्षेत ते संचालक कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई)

13. अश्विनीकुमार – (प्रतिक्षेत ते व्यव.संचालक राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई)