राज्यातील 15 IAS अधिकार्‍यांच्या बदल्या, प्रवीण दराडे, जयश्री भोज, अश्विनी जोशींचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोमवारी राज्य सरकारने आणखी 15 आयएएस अधिकार्‍यांची बदली केली आहे. यामध्ये प्रवीण दराडे, पल्लवी दराडे हे आयएएस दाम्पत्य, जयश्री भोज, अश्विनी जोशी, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, चंद्रकांत डांगे, सुधाकर शिंदे इत्यादींचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून आएएस अधिकार्‍यांच्या टप्प्याटप्प्याने बदल्या केल्या जात असून आज आणखी पंधरा जणांची प्रतिक्षा संपली आहे.

अधिकार्‍याचे नाव – सध्याचे पद – बदलीचे ठिकाण

1 प्रवीण दराडे – प्रतीक्षेत – व्यवस्थापकीय संचालक लघु उद्योग विकास महामंडळ
2 जयश्री भोज – व्यवस्थापकीय संचालक लघु उद्योग विकास महामंडळ – व्यवस्थापकीय संचालक माहिती तंत्रज्ञान महामंडळ
3 पल्लवी दराडे – …..- सहसचिव, गृह विभाग मंत्रालय
4 ए. आर. काळे – प्रतीक्षेत – आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन
5 अश्विनी जोशी – प्रतीक्षेत – व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पो.
6 मल्लिनाथ कलशेट्री – प्रतीक्षेत – संचालक, भूजल सर्वेक्षण; पुणे
7 आर.बी.भोसले – अतिरिक्त विभा आयुक्त, पुणे – जिल्हाधिकारी अहमदनगर
8 एच.पी.तुम्मोड – प्रतीक्षेत – आयुक्त, दुग्धविकास, मुंबई
9 चंद्रकांत डांगे – संचालक, भुजल सर्वेक्षण; पुणे – प्रकल्प संचालक एड्स नियंत्रण सोसायटी
10 एम.बी.वारभुवन – प्रतीक्षेत – सीईओ महात्मा फुले जनआरोग्य योजना; मुंबई
11 आर.एस.क्षीरसागर – अति.आयक्त कोकण – सीईओ, जि.प., अहमदनगर
12 बी.बी.दांगडे – अध्यक्ष, जातपडताळणी समिती, रायगड – सचिव,शुल्क नियमन प्राधिकरण
13 आर.के.गावडे – उपायुक्त, नाशिक विभाग – सीईओ, जि.प., नंदुरबार
14 सुधाकर शिंदे – सीईओ, जनआरोग्य योजना – उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग
15 के. एच. कुलकर्णी – प्रतीक्षेत – संचालक नगरपालिका प्रशासन

You might also like