IAS Transfers : राज्यातील 6 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पेट्रोकेमिकलच्या एमडी डॉ अश्विनी जोशी (Dr Ashwini Joshi) यांची बदली रद्द करण्यात आली आहे. याचसोबत डॉ सुधाकर शिंदे (Dr Sudhakar Shinde) यांची सामान्य प्रशासन विभागात झालेली बदली देखील रद्द करण्यात आली आहे.

राहुल द्विवेदी (Rahul Dwivedi) यांची बदली समग्र शिक्षण अभियानच्या राज्य प्रकल्प संचालकपदी झाली आहे. तर शंतनू गोयल यांची बदली नागपूरच्या मनरेगा आयुक्तपदी झाली आहे. एम व्ही मोहिते यांची बदली वाशिमचे नवे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. तर सामान्य प्रशासन सहसचिव म्हणून अजित पाटील यांची बदली झाली आहे.

पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन निर्मिती मंडळ (बालभारती) आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (एससीईआरटी) या दोन्ही संस्थांचा भ्रष्ट कारभार उघड करणाऱ्या प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक अश्विनी जोशी यांचीच राज्य सरकारनं ऑगस्टमध्ये बदली केली होती. अश्विनी जोशी यांना तात्काळ पदावरून मुक्त करीत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे कार्यभार सोपवण्याचे आदेश देण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांची नव्यानं कुठेही नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. आता पुन्हा नवीन नियुक्तीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत.