राज्यातील १३ अप्पर जिल्हाधीकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३ अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

बदली झालेल्या अप्पर जिल्हाधिकारी यांचे नाव आणि त्यापुढे कंसात कोठून कोठे बदली झाली आहे ते पुढील प्रमाणे…

भानुदास पालवे (अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर ते. अप्पर जिल्हाधिकारी औरंगाबाद), पी.एल. सोरमारे (अप्पर जिल्हाधिकारी औरंगाबाद ते अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर), प्रकाश पाटील (अप्पर जिल्हाधिकारी नागपूर ते नोंदणी उपमाहनिरीक्षक नागपूर), मिलिंद साळवे (नोंदणी उपमहानिरीक्षक नागपूर ते उपायुक्त (पुनर्वसन) विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर), श्रीकांत फडके (उपायुक्त (पुनर्वसन) विभागीय आयुक्त कार्य़ालय, नागपूर ते अप्पर जिल्हाधिकारी, नागपूर), शहाजी पवार (उपायुक्त (रो.ह.यो) विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती ते प्रतिनियुक्तीने मुख्य अधिकारी मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ म्हाडा), अनंत दहिफळे (मुख्य अधिकारी, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ म्हाडा ते उपायुक्त (सामान्य) विभागीय आयुक्त कार्य़ालय, कोकण विभाग नवी मुंबई), संजय पवार (अप्पर जिल्हाधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ते अप्पर जिल्हाधिकारी अमरावती), प्रकाश खपले (अप्पर जिल्हाधिकारी जालना ते उपायुक्त (पुनर्वसन) विभागीय आयुक्त कार्य़ालय औरंगाबाद), किसन जावळे (अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी व सर्वे अधिकारी सिडको नवी मुंबई ते अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य नियंत्रक (अनधिकृत बांधकाम) सिडको, नवी मुंबई), संजय भागवत (सह मुख्य अधिकारी, म्हाडा, मुंबई ते अप्पर जिल्हाधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण),जीवन गलांडे (अप्पर जिल्हाधिकारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ते सहमुख्य अधिकारी, म्हाडा, मुंबई), शिवाजी कादबाने (उपायुक्त (क.शु.) विभागीय आयुक्त कार्य़ालय, कोकण विभाग ते उपायुक्त (पुरवठा) विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई)