राज्यातील १४ पोलीस उप अधिक्षकांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य पोलीस दलातील १४ पोलीस उप अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या बदलीचे आदेश आज (शुक्रवार) रात्री काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलीस उप अधीक्षकांचे नाव आणि कोठून कोठे बदली झाली हे पुढीलप्रमाणे…

अनिलकुमार निवृत्ती लंभाते (पोलीस उप अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते पोलीस उ अधीक्षक (मुख्यालय), पुणे ग्रामीण), डॉ. सागर रत्नकुमार कवडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज उपविभाग, सांगली (बदली आदेशाधीन) ते उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर उपविभाग, सोलापूर ग्रामीण), डॉ. रजणजीत जगन्नाथ पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, दहीवडी उपविभाग, सातारा (बदली आदेशाधीन) ते उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर उपविभाग, रायगड), नीता अशोक पाडवी (उपविभागीय पोलीस अधिकारी, मुरबाड उपविभाग, ठाणे ग्रामीण (बदली आदेशाधिन) ते सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर), शेख नजीर अब्दुल रहेमान (पोलीस उपअधिक्षक (मुख्यालय), जळगाव (बदली आदेशाधिन) ते उप विभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव उपविभाग, जिल्हा जळगाव), अजय रामराव कदम (सहायक पोलस आयुक्त, बृहन्मुंबई (बदली आदेशाधिन) ते सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई), शिवाजी बाबुराव जाधव (सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर (बदली आदेशाधिन) ते पोलीस उपअधिक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुधाकर पोपट यादव (पोलीस उपअधिक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर ते महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी, पुणे), अनुराधा कृ. गुरव (उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा उपविभाग, जि. रत्नागिरी ते पोलीस उपअधिक्षक (मुख्यालय) उस्मानाबाद), अनिकेत गंगाधरराव भारती (उप विभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर उपविभाग, सोलापूर ग्रामीण ते उप विभागीय पोलीस अधिकारी, मिरज उपविभाग, जिल्हा सांगली), विजय तुकाराम पांढरपट्टे (उप विभागीय पोलीस अधिकारी, खालापूर उपविभाग जि. रायगड ते पोलीस उपअधिक्षक (मुख्यालय) रायगड, शरद महाबळेश्वर नाईक (पदोन्नतीवरील पदस्थापनेच्या प्रतिक्षेत) ते सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर), पांडुरंग नारायण शिंदे (पदोन्नतीवरील पदस्थापनेच्या प्रतिक्षेत) ते सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर), सुनिल जायभाये (उप विभागीय पोलीस अधिकारी, अंजनगाव उपविभाग, अमरावती ते उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकरदन उपविभाग जि. जालना)