राज्यातील ४३ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

राज्य शासनाने गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील एकूण ४३ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे तसेच प्रतिनियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.

पुणे प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे उपजिल्हाधिकारी मुकेश काकडे यांच्यासह एकूण सहा उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्यातून चार उपजिल्हाधिकाऱ्यांची राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B079M4BMJT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c68788b5-a755-11e8-9e2f-d1ffd6104812′]

उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे सध्याचे नियुक्तीचे ठिकाण आणि बदलीनंतरचे ठिकाण पुढीलप्रमाणे : सुनील थोरवे (सोलापूर जिल्हा पुनर्वसन अधिकारी- पुणे उपजिल्हाधिकारी), मुकेश काकडे (पुणे उपजिल्हाधिकारी-पुणे सहायक आयुक्त), विद्युत वरखेडकर (उपजिल्हाधिकारी पीएमआरडीए-पुणे उपजिल्हाधिकारी), अस्मिता मोरे (वाई उपविभागीय अधिकारी-पुणे अन्नधान्य वितरण अधिकारी), स्नेहल बर्गे (पुणे उपजिल्हाधिकारी-पुणे जिल्हा पुनर्वसन अधिकारी), राजेंद्र जाधव (सांगली उपजिल्हाधिकारी- भोर उपविभागीय अधिकारी), विजया पांगारकर (पुणे उपजिल्हाधिकारी-गडहिंग्लज-कोल्हापूर उपविभागीय अधिकारी), मौसमी बर्डे-चौघुले (भोर उपविभागीय अधिकारी-सातारा उपजिल्हाधिकारी भूसंपादन), स्नेहा किसवे (पुणे सहायक आयुक्त- सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी), संदीप माने (पुणे जिल्हा पुनर्वसन अधिकारी- उपजिल्हाधिकारी सिडको, नवी मुंबई), गोविंद शिंदे (धुळे जिल्हा पुरवठा अधिकारी-जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी), नितीन गावंडे (शिरपुर-धुळे उपविभागीय अधिकारी- धुळे जिल्हा पुरवठा अधिकारी), विक्रम बांदल (पाथर्डी-अहमदनगर उपविभागीय अधिकारी-शिरपूर-धुळे जिल्हा पुरवठा अधिकारी), देवदत्त केकाण (सचिव, नंदुरबार-पाथर्डी उपविभागीय अधिकारी), जितेंद्र पाटील (जळगाव रोहियो उपजिल्हाधिकारी- जळगाव उपविभागीय अधिकारी), शुभांगी भारदे (धुळे जिल्हा पुनर्वसन अधिकारी-जळगाव जिल्हा पुनर्वसन अधिकारी), रविंद्र भारदे (धुळे उपजिल्हाधिकारी भूसंपादन-जळगाव उपजिल्हाधिकारी), रवींद्र कुंभारे (नागपूर अतिरीक्त महापालिका आयुक्त-नागपूर उपजिल्हाधिकारी), घनश्याम भूगावकर (नागपूर सहायक आयुक्त-चंद्रपूर निवासी उपजिल्हाधिकारी), राजेश पारनाईक (वाशिम उपविभागीय अधिकारी-बुलढाणा उपविभागीय अधिकारी), अनिल खंडागळे (अमरावती उपविभागीय अधिकारी-अकोला उपजिल्हाधिकारी भूसंपादन), सरिता सुत्रावे (औरंगाबाद सहायक आयुक्त-औरंगाबाद विशेष भूसंपादन अधिकारी), चंद्रकांत सूर्यवंशी (बीड निवासी उपजिल्हाधिकारी-हिंगोली निवासी उपजिल्हाधिकारी), रवींद्र परळीकर (औरंगाबाद विशेष भूसंपादन अधिकारी-बीड निवासी उपजिल्हाधिकारी), विकास माने (बीड उपविभागीय अधिकारी-लातूर उपविभागीय अधिकारी), प्रभोदय मुळे (नांदेड उपविभागीय अधिकारी-बीड उपविभागीय अधिकारी), व्ही. एल. कोळी (नांदेड उपविभागीय अधिकारी-परभणी उपविभागीय अधिकारी), दिलीप कच्छवे (नांदेड उपजिल्हा निवडणूक अधिकारी-नांदेड उपजिल्हाधिकारी), दिपाली मोतीयळे (नियुक्तीच्या प्रतिक्षेत-नांदेड उपजिल्हा निवडणूक अधिकारी), के. एल. तडवी (हिंगोली उपजिल्हाधिकारी- बीड विशेष भूसंपादन अधिकारी), मोहिनी चव्हाण (सांगली उपजिल्हाधिकारी भुसंपादन-सोलापूर जिल्हा पुनर्वसन अधिकारी), वसुंधरा बारवे (सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी- सांगली उपजिल्हाधिकारी भूसंपादन), सतिश धुमाळ (सोलापूर उपजिल्हा निवडणूक अधिकारी-कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी), विवेक आगवणे (कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी- सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी), सुहासिनी गोणेवार (बुलढाणा उपजिल्हाधिकारी-बुलढाणा उपविभागीय अधिकारी), डॉ. निलेश अपार (बुलढाणा उपविभागीय अधिकारी-अकोला उपविभागीय अधिकारी), डी. ए. गोगटे (जळगाव उपविभागीय अधिकारी-वाशिम उपविभागीय अधिकारी), स्नेहा उबाळे (यवतमाळ उपजिल्हाधिकारी-बुलढाण उपविभागीय अधिकारी, प्रियंका आंबेकर (वाशिम उपजिल्हाधिकारी- अमरावती उपविभागीय अधिकारी), तुषार ठोंबरे (सांगली उपजिल्हाधिकारी-सांगली उपविभागीय अधिकारी, स्वाती देशमुख-पाटील (सातारा उपविभागीय अधिकारी-सांगली उपजिल्हाधिकारी), विजयसिंह पाटील (नवी मुंबई,सिडको उपजिल्हाधिकारी – सातारा उपविभागीय अधिकारी), संगीता चौगुले-राजापूरकर (गडहिंग्लज-कोल्हापूर उपविभागीय अधिकारी-सातार उपविभागीय अधिकारी).