राज्यातील 5 सहाय्यक आयुक्‍त / डीवायएसपींच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने राज्यातील 5 सहाय्यक पोलिस आयुक्‍त / पोलिस उपाधिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यांच्या बदलीबाबतचे आदेश सोमवारी सायंकाळी काढण्यात आले आहे. बदली झालेल्या सहाय्यक पोलिस आयुक्‍तांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे.

विजय वसंतराव पळसुले (पोलिस उप अधीक्षक, विशेष कृती दल, नक्षल विरोधी अभियान, नागपुर ते अप्पर पोलिस अधीक्षक (एटप), महाराष्ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनी, पुणे), रविंद्र बाळकृष्ण गिड्डे (उपविभागीय पोलिस अधिकारी, माणगांव उपविभाग, रायगड – बदल आदेशाधीन ते सहाय्यक पोलिस आयुक्‍त, नवी मुंबई), पोपट बहिरू दडस (सहाय्यक समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 3, जालना ते सहाय्यक समादेश, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 7, दौंड), मोहम्मद युनुस मोहम्मद ईस्माईल काद्री (सहाय्यक समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 4, नागपूर ते सहाय्यक समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 1, पुणे) आणि अनिल गजानन भोपे (पोलिस उप अधीक्षक, बिनतारी संदेश, नागपूर पूर्व विभाग, नागपूर ते पोलीस उप अधीक्षक, प्रशिक्षण केंद्र, पुणे).